जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?
जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे? मानवाने सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली. जंगलात राहणारा आदिमानव ते एकविसाव्या शतकातील प्रगती पथावरील पांथस्थ असा प्रवास घडला. लाईट, टेलिफोन, वाफेचे इंजिन, विमान, जहाजे, संगणक, शेती, विज्ञान, तंत्रज्ञान असे नवनवीन शोध लावत सर्वच क्षेत्रात बदल घडवून आणले. पृथ्वी अपुरी पडू लागल्याने इतर ग्रहांचा आसरा शोधू लागलो. पुर्वी एक किलोमीटर जायला दहा ते पंधरा मिनिटे लागत होती, आज हजारों किलोमीटर चे अंतर काही तासांत पादाक्रांत करता येते. थोडक्यात विविध क्षेत्रातील अमुलाग्र बदलामुळे जीवनमान उंचावले. मात्र ही प्रगती करीत असताना काही पावले काळाच्या ओघात अधोगतीकडे कधी वळली, याचा विचार करायला उसंतच नाही. खेड्यात जोडणी (माळवद), आरसीसी च्या पक्क्या घरात राहणारे असो की शहरात आयटी क्षेत्र किंवा कोणत्याही परिस्थितीत कार्य करणारे चाकरमानी किंवा कामगार असोत. शहरी किंवा ग्रामीण भागातील आई-वडिलांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काही अपवाद वगळता इतरांना हे ओझे का वाटावे, काळजी घेणा-या महत्भागी मुलांचे स्वागच. मात्र या गंभीर प्रश्नाव...