Posts

Showing posts with the label हमीभाव

व्यथा बळीराजाची

Image
                           व्यथा बळीराजाची            भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील साठ ते सत्तर टक्के लोक आजही ग्रामीण भागात राहतात.त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. स्वतः अठरा तासांपेक्षा अधिक राबून अन्नधान्याचे प्रचंड उत्पादन घेतो. इतरांना खाण्याची सोय करतो, मात्र त्याला अर्धपोटी राहावे लागते. प्रसंगी उपाशीपोटी झोपावे लागते. याला जबाबदार कोण? स्वातंत्र्याच्या वेळी ३३ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. आजमितीला १३५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला पुरवून सुद्धा त्याची अनेक देशांत निर्यात केली जाते. म्हणजे शेतजमीन तर वाढली नाही. उलट धरणं, औद्योगिक वसाहती, घरे किंवा विविध बाबीतून कमीच झाली. एकंदरीत चौपटीहून अधिक उत्पादन वाढले तरी शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडून आले नाहीत. त्याची झोपडी, गळके घरं, ठिगळ लावलेले धोतर किंवा नऊवारी यात बदल झालेला नाही. याला जबाबदार कोण? यात शासनाची चूकीचे धोरणे, निसर्गाचा लहरीपणा, दलालीचा हव्यास यांसारख्या अनेक बाबींचा ...