Posts

Showing posts with the label सामाजिक विषय

तिची चूक काय होती?

Image
 तिची चूक काय होती?           दर्शना पवार नावाची साखर कारखान्यातील एका ड्रायव्हरची खेडेगावातील मुलगी. MPSC परिक्षेत राज्यात तिसरी येत "तिने रेंज फॉरेस्ट ऑफिसर" ची पोस्ट काढली. गावात सत्काराचे मिरवणूक काढण्यात आली. सर्वत्र तिला सत्काराला बोलावणं येवू लागलं. अशातच राहुल हंडोरे या ओळखीच्या तरुणाने ट्रेकिंग च्या बहाण्याने १२ जून रोजी राजगडाकडे दुचाकीवरून नेले. तिथेच घात झाला. प्राथमिक माहिती नुसार लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर हल्ला केला. गुराख्यांना वेल्हे तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याशी कुजलेला मृतदेह आढळला. 'फादर्स डे' दिवशी तिच्या वडिलांना मृतदेह ओळखण्याचे दुर्दैवी काम करावे लागले. यात तिची चूक कोणती? जगात नसल्याने गेल्या सात-आठ दिवसांपासून अनेकांनी तिलाच आरोपीच्या कटघ-यात उभे केले. एक तर आरोपांना उत्तर द्यायला ती जिवंत नाही. अनेकांनी तर तिच्यावर वाट्टेल ते आरोप केले, काहींनी तोंडसुख घेतले. ती तिथे का गेली? लग्नास नकार का दिला? अशा प्रश्नांची सरबत्ती तिच्यावर करण्यात आली.            वडील साखर कारखान्यात ड्रायव्हर...