गोदाकाठचे तिर्थक्षेत्र; श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी
गोदाकाठचे तिर्थक्षेत्र; श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी (प्रासंगिक: अधिक मास/ धोंड्याचा महिना विशेष) दर तीन वर्षांनी येणारा मराठी अधिक महिना म्हणजे अधिक मास किंवा धोंड्याचा महिना होय. त्यालाच मल मास, पुरुषोत्तम मास या नावाने देखील ओळखले जाते. या अधिकमासाचे दैवत असलेल्या 'भगवान पुरुषोत्तमाचे' संपूर्ण भारतातील एकमेव मंदिर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे आहे. आज आपण अधिक मास आणि पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाची महती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. कल्याण ते विशाखापटनम या राष्ट्रीय महामार्गाजवळ माजलगाव पासून 21 किलोमीटर अंतरावर उत्तरेला पुरुषोत्तमपुरी हे गाव वसलेले आहे. तर खामगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर सादोळा फाट्याजवळ पश्चिमेला अवघ्या ६ की.मी. अंतरावर हे धार्मिक स्थळ आहे. माजलगाव पासून याठिकाणी दर अर्ध्या तासाला बसची सोय आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई हुन तलवडा मार्गे पुर्वेकडे जाणा-या राज्य महामार्गावरून ते २ कि.मी. अंतरावर तर जालना जिल्ह्यातील परतुर हून दक्षिणेकडे गोळेगाव या गावातून देवस्थानला होडीतून जाता य...