भ्रष्टाचार; भारतीय व्यवस्थेला लागलेला कलंक
भ्रष्टाचार; भारतीय व्यवस्थेला लागलेला कलंक भ्रष्टाचार ही भारतीय व्यवस्थेला लागलेली किड आहे. प्रत्येक नागरिकाचा भ्रष्टाचाराशी कुठे ना कुठे संबंध येतोच. सर्वच क्षेत्रात त्याची पाळेमुळे रूजलेली आहेत. हा एक समाजस्पर्शी विषय आहे. तो सर्वाचार झाला आहे. सर्व सामान्यांच्या भावना या बाबतीत बोथट झाल्या आहेत. सरकार दप्तरी असलेले आपले कोणतेही काम चिरीमिरी दिल्याशिवाय पुर्ण होतच नाही. नसता फाईल अपूर्ण आहे असा शेरा मारून फाईल उलटा प्रवास करते. काही सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या 🏠 घरातून करोडो रूपयांच्या नोटा, किलोने सोने, नांवावर कोट्यावधींच्या जमिनी, फ्लॅट, अनेक एकरांवर पसरलेले विस्तीर्ण फार्म हाऊस, महागडे बंगले, जवळच्या नातेवाईक व मित्रपरिवार यांच्या नावाने प्रोपर्टी इन्कमटॅक्सच्या किंवा ईडी च्या धाडीत सापडलेल्या आहेत. ह्या झाल्या सापडलेल्या, मग न सापडलेल्या किती असतील याची कल्पना न केलेली बरी. हा सर्वसामान्याच्या उदासिनतेचा परिपाक आहे. आपल्याला काय त्याचे? काम लवकर करायचे असेल तर द्यावेच लागतात अशी सर्वसामान्य जनतेची वाक्ये सहज 👂 कानी पडतात. सरकार...