Posts

Showing posts with the label बालपण

बालपण हरवत चाललंय

बालपण हरवत चाललंय   बालपण म्हणजे निरागस, निर्विकारपणे व्यक्त होण्याची संधी. गतकाळात लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानाची गरज पडत नव्हती. सगळीकडे भलेमोठे मैदानच होते. आजूबाजूला फार मोठी बांधकामे झालेली नव्हती. वाटेल तेथे, वाटेल तो खेळ, वाटेल तेंव्हा खेळण्याची परवानगी होती. आजच्या काळातील फारशी बंधने नव्हती. पक्षी जसा स्वच्छंदी जीवन जगतो, अगदी तसेच जीवन या चिमुरड्यांच्या वाट्याला होते. मात्र बदलत्या काळानुसार बदलत्या अपेक्षेने मनमोकळे खेळण्यावर बंधनं आली. ख-याखु-या जीवनाला पारखे होत चाललेल्या चिमुकल्यांच्या हरवत चाललेल्या बालपणावर या लेखात ऊहापोह करू.             आपण आपल्या लहानपणात डोकावले तर अनेक गोष्टींचा धांडोळा समोर येईल. पाऊस भरपूर पडायचा, सर्वत्र चिखल असायचा. या चिखला पासूनच खेळण्यास सुरुवात व्हायची. अंगणात किंवा थोड्याच अंतरावर वर असलेला चिखल खेळायला उपयोगी पडे. त्यापासून जशी कल्पना सुचेल, ते बनवता येत होते. बैल, गाय, म्हैस, माणूस, रेडिओ, गणपती, मंदिर, किल्ला, टुमदार घर, सायकल अशा कितीतरी बाबींची वेडीवाकडी निर्मिती केली जायची. पाऊस भरपूर प...