Posts

Showing posts with the label स्त्रीभ्रूणहत्या

स्त्रिभ्रुणहत्या; एक अभिशाप

Image
 स्त्रिभ्रुणहत्या; एक अभिशाप            समाजात आदिशक्तीचे रूप म्हणून स्त्रीकडे पाहीले जाते. भावना चांगली असली तरी प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. या देविस्वरूप आदिशक्तीचा जन्मापूर्वीच गळा घोटला जातो. वेदकाळात वेद अध्ययनाचा स्त्रियांना अधिकार होता. बौद्ध काळात महात्मा बुद्धांनी स्त्रियांना समानतेने वागण्याची दिशा दिली. राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले, पं.ईश्वरचंद्र विद्यासागर, लोकमान्य टिळक यांसारख्या विचारवंतांनी स्त्री परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. पितृसत्ताक कुटूंब पद्धतीमुळे स्त्रियांना समाजात दुय्यम स्वरूपाची वागणूक मिळू लागली. ज्या ज्या कुटूंबात 'पिता' किंवा 'भाऊ' कुटूंबप्रमुख असतो. वंश पित्याच्या नावाने चालतो,  कुटूंबातील स्त्रियांचा दर्जा दुय्यम असतो, पत्नी विवाहा नंतर पतीच्या घरी राहावयास येते अशा कुटूंबास पितृसत्ताक कुटूंब असे म्हणतात. ही कुटूंबे पितृस्थानीय असतात. या कुटूंबात पित्याचा म्हणजे कर्त्याचा शब्द अखेरचा मानला जातो. पित्याच्या मृत्यूनंतर वयाने मोठा असणाऱ्या पुरुषाकडे परंपरेने हे अधिकार हस्तांतरित होतात. त्यावेळी स्त्री ...