Posts

Showing posts with the label समृध्दी महामार्ग

समृध्दी महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

Image
 समृध्दी महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा           आजची सकाळ अत्यंत दु:खद आणि मनाला चटका लावणा-या बातमीने झाली. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुंटा येथे समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा दुर्दैवी अपघात होवून बस जळून खाक होत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर आठ जणांचा सिंदखेडराजा येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. या महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात असल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख तर पंतप्रधानांनी पीएमएनआरएफ मधून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये मदतीची घोषणा केली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनाही मदत घोषित करण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्दैवी घटनेत अपघाताने मरण्यापेक्षा होरपळून मृत्यु हे वेदनादायी आहे. चार दिवस मिडिया आणि वर्तमान पत्रात चर्चा होईल, मात्र यावर दीर्घकालीन उपाययोजना महत्वाच्या आहेत.             मुंबई-नागपुर द्रुतगती मार्ग ७०१ किमी लांबीच...