Posts

Showing posts with the label दहावी

दहावी नंतरच्या करिअरच्या वाटा

Image
 दहावी नंतरच्या करिअरच्या वाटा           पैसा हाच उद्देश करिअरच्या बाबतीत नसावा तर आपल्या अंगी असलेले कौशल्य, ज्ञान याचाही महत्त्वाचा रोल ठरतो. त्या क्षेत्रातील आव्हाने काय आहेत, मर्यादा कोणत्या आहेत याचाही विचार करिअर निवडताना केला पाहिजे. नुकतेच दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले. त्यात काहींना समाधानकारक गुण संपादन करता आले. तर काहींची अपेक्षापूर्ती झाली नाही. मुळात या गुणांवर आधारित कोणतेही कोर्सेस राहिले नाहीत, काही अपवाद सोडले तर. प्रत्येकाची एक वेगळी चाचणी परीक्षा आहे. त्यामुळे त्या वर्गात या चाचणीसाठी पात्र ठरु एवढे गुण असले तरी पुरेसे आहेत. प्रत्येक आई-वडिलांचे एक स्वप्न असते. आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर किंवा इंजिनिअर झाले पाहिजेत. त्यांची अपेक्षा पालक म्हणून रास्त आहे. आपल्याला जे मिळाले नाही, त्यापेक्षा अधिक लावण्याची पालकांची तयारी असते. मात्र सर्वांना ते शक्य नाही. त्यामुळे अजिबात निराश व्हायचे कारण नाही. डॉक्टर किंवा इंजिनिअर होवून जे करता येणार नाही, मिळवता येणार नाही, त्याही पेक्षा दर्जेदार आण...