Posts

Showing posts with the label व्यसन

व्यसन 📱 मोबाईलचे

Image
 व्यसन 📱 मोबाईलचे            पुर्वी मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा होत्या. त्यात मोबाईल ही चौथी गरज आजच्या काळात वाढली. मोबाईल मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. कारण जवळ मोबाईल नसला की काही तरी हरवल्या सारखे अनेकांना वाटते. मोबाईलचा वापर सकाळी उजाडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत होता. सकाळी गुडमॉर्निंग पासून याची सुरुवात होते. दुध वाल्याला उशीर झाला तर त्याला 🤙 कॉल केला जातो. दाढी-कटींग करायची असेल तर नाव्ह्याकडे किती नंबर आहेत, याची चाचपणी केली जाते. किराणा मालाचे पैसे फोन- पे वरून अदा केले जातात. घरी कोणी आजारी असेल तर डॉक्टरांकडे नंबर लावण्यासाठी त्याचा वापर होतो. नविन माहिती त्याद्वारे मिळते. सणावारांच्या शुभेच्छा याद्वारे दिल्या जातात. मनोरंजनाचे साधन म्हणून त्याकडे पाहिले जाते. लहानग्यांच्या अंगाई पासून ते वयस्करांचे आवडते किर्तन-भजन ऐकता येते. तरूणाईची आवड असलेले सिनेमे, गाणे ऐकता येते. प्रवास करायचा असेल आणि रस्ता माहित नसेल तर गुगल मॅप द्वारे सहज तेथे पोहोचता येते. अभ्यास करताना सुद्धा तो उपयोगी पडतो. लॉकडाउन काळा...