नकार पचावायला शिका
नकार पचावायला शिका एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले. औद्योगिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, सामाजिक अशा विविध बदलांमुळे जग जवळ आलं. जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यापुढे जावून मानवतेच्या पातळीवर व्यवहार सुरू झाले. स्त्री-पुरूष समानतेचे वारे वाहू लागले. शिक्षणामूळे मुला-मुलींना घरापासून, आई-वडीलांपासून दूर राहावे लागले. शालेय, महाविद्यालयीन जीवनात मुला-मुलात, मुली-मुलीत जवळीकता वाढून मैत्री निर्माण झाली. मुला-मुलीतही मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले, जे काळानुरूप आवश्यक होते. मात्र यातून काही गैरप्रकार समोर आले. ज्यामुळे आई-वडीलांच्या समोर गंभीर प्रश्न निर्माण झाले. दर्शना पवार ची झालेली हत्या हे त्याचेच प्रतीक ठरते. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते. मात्र वेळप्रसंगी समोरून नकार असेल तर तो पचवण्याचे औदार्य मुलाने किंवा मुलीने दाखवले पाहिजे. यातून त्याचा/तिचा बळी तर जातोच शिवाय घरच्यांचे हाल होतात. शहरी भागातील पालक राहतात त्या ठिकाणी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी किमान सोबत तरी असतात. त्यां...