टी.आर.पी. चा बागूलबुवा
टी.आर.पी. चा बागूलबुवा टीव्ही सिरीयल्स न्यूज चॅनल पहाणा-यांना टी.आर.पी. हा परवलीचा शब्द बनला आहे. तो त्यांच्या वारंवार 👂 कानावर पडतो. आपण टीव्ही वरील मालिका, चित्रपट किंवा बातम्या पाहताना मनात विचार येतो की, टीव्हीवाल्यांची कमाई किती आणि ती कोणत्या पद्धतीने होते, या सर्व प्रश्नांची उत्तरे या ब्लॉग मधून मिळतील. टी.आर.पी. चा अर्थ:- इंग्रजीतील TRP:- Television rating point हा फुलफॉर्म आहे.टीव्हीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व चैनल पैकी जो चॅनल किंवा शो जास्त वेळा बघितला जातो त्यास टीआरपी म्हणतात. टीआरपी म्हणजे ठराविक लोकसंख्येच्या लोकांनी ठराविक वेळेला पाहिलेल्या कार्यक्रमाची टक्केवारी होय. हे एक उपकरण आहे.याच्या सहाय्याने कोणत्याही टी.व्ही. चॅनल पाहणारांची संख्या गणली जाते. यामुळे त्या चॅनेल ची लोकप्रियता किती आहे हे कळू शकते. ज्या चॅनलला जास्त टी.आर.पी. त्याला प्रेक्षक अधिक संख्येने पाहत आहेत, अशी प्रचिती येते. टी.आर.पी. ची माहिती जाहिरात एजन्सी करीता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. ज्या चॅनेल वर जास्त ट...