सोशल मीडियाची चटक वाढतेय
सोशल मीडियाची चटक वाढतेय सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असले तरी त्याचा अतिरेकी वापर वाढल्याने मानवास विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा . मात्र बदलत्या काळानुसार मोबाईल आणि सोशल मीडिया ही सुद्धा आणखी एक गरज बनत आहे. हे मी सांगत नाही तर जागतिक पातळीवरील एका सर्व्हेतून समोर आलेले आहे. आज महालापासून ते झोपडी पर्यन्त सर्वांना मोबाईल लागतोच. नव्हे तो आहेच. उपरोधाने आपण म्हणत होतो की मोबाइल जिवनावश्यक आहे, आत्ता तर ते खरे निघत आहे. झोपेतून उठल्या उठल्या पहिल्यांदा मनुष्य काय शोधत असेल तर तो मोबाईल. मग तो किती वाजले हे पाहण्यासाठी असो, व्हाट्सअप मेसेजेस चेक करण्यासाठी असो किंवा इतर कोणत्याही बाबींसाठी असो. कोणी काय स्टेटस ठेवले किंवा आपणास काय स्टेटस ठेवायचे हे बरेच जण झोपेतून जागे झालेकीच ठरवतात. पहिले 'बेड टी' ला नांवे ठेवली जात. आत्ता त्याच्याही अगोदर मोबाईलच्या माध्यमातून सोशिअल मिडियाचा प्रभावी वापर सुरू आहे. अनेक मोबाईल कंपन्यांनी सुरूवातीला फ्री डेटा देवून इंटरनेट वापरण्याची सवय अंगवळ...