सोशल मीडियाची चटक वाढतेय
सोशल मीडियाची चटक वाढतेय
सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असले तरी त्याचा अतिरेकी वापर वाढल्याने मानवास विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा . मात्र बदलत्या काळानुसार मोबाईल आणि सोशल मीडिया ही सुद्धा आणखी एक गरज बनत आहे. हे मी सांगत नाही तर जागतिक पातळीवरील एका सर्व्हेतून समोर आलेले आहे. आज महालापासून ते झोपडी पर्यन्त सर्वांना मोबाईल लागतोच. नव्हे तो आहेच. उपरोधाने आपण म्हणत होतो की मोबाइल जिवनावश्यक आहे, आत्ता तर ते खरे निघत आहे. झोपेतून उठल्या उठल्या पहिल्यांदा मनुष्य काय शोधत असेल तर तो मोबाईल. मग तो किती वाजले हे पाहण्यासाठी असो, व्हाट्सअप मेसेजेस चेक करण्यासाठी असो किंवा इतर कोणत्याही बाबींसाठी असो. कोणी काय स्टेटस ठेवले किंवा आपणास काय स्टेटस ठेवायचे हे बरेच जण झोपेतून जागे झालेकीच ठरवतात. पहिले 'बेड टी' ला नांवे ठेवली जात. आत्ता त्याच्याही अगोदर मोबाईलच्या माध्यमातून सोशिअल मिडियाचा प्रभावी वापर सुरू आहे. अनेक मोबाईल कंपन्यांनी सुरूवातीला फ्री डेटा देवून इंटरनेट वापरण्याची सवय अंगवळणी पाडली. लोकांना सवय लागल्यानंतर हळूहळू त्याच्या किंमती वाढवण्यास सुरुवात केली. लोकांना सवयीप्रमाणे ते आवश्यकच वाटू लागले. आज 🤙 कॉलिंगसाठी मोबाईल लागतो, मात्र फक्त कॉलिंगचे बॅलेन्स काही मोजक्याच लोकांकडे आढळते. त्यासोबतच इंटरनेट डेटा असलेलेच बहूसंख्य दिसतील.
फेसबुक हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. त्यावरील रिल्स तासनतास पाहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. 🏡 घरात लहान मुलं असतील तर त्यांना सांभाळण्याची कटकट राहीली नाही. साधा, सोपा आणि सरळ उपाय म्हणजे त्यांना मोबाईल लावून द्यायचा. तेही कित्येक वेळ त्याचा आनंद घेत वेगळ्याच विश्वात रममाण होतात. त्यांनाही तहानभूक लागली की नाही याचे भान राहात नाही. युट्यूब, डाउनलोड केलेले व्हिडिओ पाहण्यात जेवण होते. काय खाल्ले? कशासाठी खाल्ले याचे तारतम्य किती जण बाळगून असतात. मोबाईल नसेल तर लहानग्यांना जेवू घालणे अनेक ठिकाणी अग्निदिव्य बनले आहे.कोवळ्या डोळ्यांना 👃 नाकावर ओझं झेपत नाही एवढ्या वजनाचा जाड भिंगाचा 👓 चष्मा अगदी नर्सरी, बालवाडी पासून लागल्याचे भयावह चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. काही मुलांना शाळेत समोरच्या बाकावर बसावे लागते. कारण पाठीमागे बसलं तर बोर्डवर लिहीलेले दिसत नाही. हे मोबाईल वेड फक्त भारतीयांनाच नाही तर जवळपास जगभर याचे लोणं पसरले आहे. या सर्व्हेनुसार जगातील ६५ टक्के लोक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहतात. दररोज सरासरी अडीच तास करतात ते सर्फिंग करतात. हा गंभीर आणि संशोधनाचा विषय आहे. वैद्यकीय विभागात लोकांना यातून कसे बाहेर काढावयाचे यासाठी पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा लागेल की काय अशी भिती यातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. माणसाच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये आता इंटरनेट आणि सोशल मीडियाचा समावेश जवळपास झालाच आहे. आपला फोन जवळ नसल्यास कित्येक लोकांना अस्वस्थ वाटू लागतं, तर सोशल मीडियाशिवाय आपण राहू शकत नसल्याचंही कित्येक लोक म्हणतात. मध्यंतरी काही तांत्रिक कारणांमुळे सात-आठ दिवस इंटरनेट बंद ठेवावे लागल्याने काहींना काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते. तर ब-याच दिवसांनी 'फार बरं वाटलं' अशा काहींच्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या.
आपणासही सोशल मीडियाचं व्यसन लागलंय असं वाटत असेल, तर आपण एकटे नाही आहोत. जगभरात तब्बल ५.१९ बिलियन लोक सोशल मीडिया वापरतात असं एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे. म्हणजेच, जगातील सुमारे ६५ टक्के लोक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या ३.७ टक्क्यांनी वाढली आहे. भविष्य कसे असेल याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे.
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था असणाऱ्या एएफपीने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील लोक दिवसाचे सरासरी २ तास २६ मिनिटं एवढा वेळ सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. या रिपोर्टमधील माहितीनुसार, ब्राझीलमधील लोक सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ व्यतीत करतात. या देशातील लोक दिवसाचे सुमारे ३ तास ४९ मिनिटं सोशल मीडियावर स्क्रोल करतात. तर जपानचे लोक सर्वात कमी, म्हणजेच दिवसातून एक तासाहून कमी वेळ सोशल मीडिया वापरतात
सोशल मिडियावरील प्रसिद्ध अॅप्स:-
आपल्या मोबाईल स्क्रीनवर अनेक अॅप्स 🏡 घर करून आहेत. दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्समध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचा समावेश होतो. हे तिन्ही अॅप मेटा कंपनीचे आहेत. यानंतर वुईचॅट, टिकटॉक आणि डोऊयिन या अॅप्सचा क्रमांक लागतो. त्यानंतर ट्विटर, टेलिग्राम आणि मेसेंजर हे अॅप्स लोकप्रिय आहेत. नुकतंच लाँच झालेलं थ्रेड्स हे अॅपदेखील अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. या अॅपचे जगातील १५० मिलियन यूजर्स झाले आहेत. कनेक्टिव्हिटी ही चांगली बाब तर इंटरनेट हा चांगला प्लॉटफार्म आहे. त्याचा चांगला आणि मर्यादित वापर असायला हवा. या सर्व गोष्टी आपल्यासाठी आहेत याची जाणीव ठेवावी लागेल. त्याच्यानुसार आपण वाहवत गेलोत तर परिणाम भयंकर भोगावे लागतील. बाकी चांगल-वाईट आपण जाणताच.
डॉ.गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर
छत्रपती संभाजीनगर

Comments
Post a Comment