लोकसंख्येचा भस्मासुर
लोकसंख्येचा भस्मासुर जगात लोकसंख्येत एक नंबरवर असलेल्या चिन ला पाठीमागे टाकण्याचा आणि जगात लोकसंख्येत एक नंबर मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावाने प्रसिद्ध झाला आहे. १४४ कोटी च्या पुढे लोकसंख्या गेलेली आहे. पृथ्वीतलावर साधारणपणे पाच लाख वर्षांपासून मानवी जीवन अस्तित्वात आहे. या कालखंडात जगातील लोकसंख्येत अनेक चढउतार झाले. काही वेळा ती कमीसुद्धा झाली. नव पाषाण युगापासून ते इ.स.१९५० पर्यंत जगाची लोकसंख्या संथगतीने वाढत होती. साथीचे महाभयंकर रोगाने मोठ्या संख्येने मनुष्यहानी व्हायची. युद्ध, दुष्काळ, महापूर, भुकंप, यांसारख्या अनेक बाबींमुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असे. त्यामुळे लोकसंख्यावाढ ही समस्या होवू शकते हे मान्यच नव्हते. लोकसंख्यावाढ ही जटील समस्या भारता समोर आ वासून उभी आहे. जगाच्या लोकसंख्येच्या १७.५% भारताची लोकसंख्या आहे. परंतू भूभागाचा विचार केला तर जगाच्या केवळ २.४% भूभाग भारताच्या वाट्याला आलेला आहे. जानेवारी २०११ मधील एका अहवालानुसार भारतात प्रत्येक मिनिटाला ५१ मुलं जन्माला येतात. त्यापैकी ११ मुल...