झळा दुष्काळाच्या
झळा दुष्काळाच्या आपण भाग्यवान आहोत, दुष्काळाच्या झळा जाणवत नाहीत. आपल्या पिढीने दुष्काळ अनुभवला नाही. मात्र ज्यांचे वय साठपेक्षा जास्त आहे, त्यांनी १९७२ चा महाभयंकर दुष्काळ अनुभवला आहे. आज पिण्यास पाणी मुबलक आहे. हरितक्रांती झाल्याने अन्नधान्य भरपूर आहे. आपण ३०% अन्नाची नासाडी करतो. भुक आहे तेवढेच ताटात घेतले पाहिजे. सर्व असताना त्याची किंमत आपल्याला करता येत नाही. दुष्काळ काय असतो, त्याची तीव्रता किती होती यावरून निश्चित बोध घेता येईल. दोन वर्षात पाऊस कमीच झाला.तिस-या वर्षी १९७२ मध्ये परिस्थितीच पालटली. कोरड्या दुष्काळामुळे सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. साधारणपणे वर्षभर पुरेल इतका धान्याचा साठा सर्वांकडे असायचा. मात्र दोन वर्षातील कमी पावसाने ती संधी सुद्धा हिरावून घेतली. शेतातील उभं पिक जळून गेल होतं. प्यायला पाणी नाही की खायला अन्न नाही अशी अन्नान दशा झाली. माणसांनाच खायला नाही म्हटल्यावर जनावरे कशी जगवायची, असा यक्ष प्रश्न होता. अन्न पाण्यावाचून गोठ्यातील जनावरे पटापटा मरून जात होती. दुष्काळा...