पेटलेलं मणिपूर
पेटलेलं मणिपूर मणिपूर मध्ये कंगपोकपी जिल्ह्यातील गावात दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना अंगावर काटा आणते. त्यांच्या शरीराला विचित्र पद्धतीने हात लावला जातोय, हे खूप भयंकरच्या पलिकडे आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. या दुर्दैवी घटनेमूळे सर्वत्र खळबळ माजली आहे. त्याहून गंभीर म्हणजे ४ मे ची ही घटना असून आत्तापर्यंत त्यावर कोणतीही कठोर कारवाई झाली नाही. म्हणजे जवळपास ७७ दिवस या प्रसंगावर चूप्पी साधली होती. कोणताही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया त्यावर बोलायला तयार नव्हता. जेंव्हा सामाजिक माध्यमातून हे वास्तव बाहेर आले, तेंव्हा लोकांच्या मनात व्यवस्थेविषयी चिड निर्माण झाली. त्या महिला कोणत्या जातीच्या किंवा धर्माच्या होत्या हा प्रश्न महत्त्वाचा नसून सर्वप्रथम त्या महिला आहेत. ही घटना पाहूनही आपले मन विचलित होत नसेल तर आपण पशु बनलोय, हे मात्र नक्की खरे आहे. कर्तृत्ववान स्त्रियांचा वारसा सांगणाऱ्या या देशात जर स्त्रियांची अशा प्रकारे 'धिंड' काढले जात असेल तर येणारा का...