Posts

Showing posts with the label ब्रॅन्डेड

जेनेरिक औषधे

Image
 जेनेरिक औषधे जेनेरिक औषधे म्हणजे ब्रॅन्डेड नेसलेली, स्वस्त पण दर्जेदार औषधे. जेनेरिक औषधांच्या बाबतीत सर्वसामान्य जनतेला फारशी माहिती नाही. प्रिस्क्रिप्शन लिहून देणारे डॉक्टर जेनेरिक औषधे पेशंटला लिहून देत नाहीत. मेडिकल स्टोअर्स वाले जेनेरिक औषधे ठेवत नाहीत. त्यामुळे स्वस्त असूनही जेनेरिक औषधे सर्वसामान्यांपासून दूर आहेत. आपण जेनेरिक औषधांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मानवाच्या जन्माअगोदर पासून ते मृत्यू पर्यंत औषधाचा अतिशय जवळचा संबंध आहे. औषधं हा अन्न, वस्त्र, निवारा सारखाच जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. देशात, जगात औषधी न वापरणारा मनुष्य सापडले दुर्मिळ आहे. मानवा बरोबरच पाळीव प्राण्यांच्या जीवनाची वाटचाल सुद्धा औषधांकडे केंव्हाच पोहोचली आहे. साध्या सर्दी, खोकला, ताप पासून ते अतिशय कठीण शस्त्रक्रियेसाठी औषधी लागतेच. पुर्वी 🌲 झाड- पाला, वनस्पती, कंदमुळे, वेली, त्यापासून मिळणारे रस अशा विविध बाबी औषधी म्हणूनच वापरल्या जात. 'आजीबाईचा बटवा' हा अत्यंत गुणकारी आणि प्रसिद्ध होता. जसं विज्ञान प्रगत होत गेले, त्याप्रमाणे औषधांचे स्वरूप बदलले. अभ्यास आणि संशोधनानंतर औषध...