दरडी का कोसळतात?
दरडी का कोसळतात? रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ईर्शाळवाडी गावातील आदिवासी वसाहतीवर मध्यरात्री मोठी दरड कोसळल्याची हृदयद्रावक घटना घडली. आत्तापर्यंत या घटनेमध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ९८ जणांना वाचविण्यात यश आले आहे. अजूनही हा आकडा वाढण्याची भीती आहे. गेल्या ३ दिवसात सुमारे ४९९ मिमी पाऊस झाला असून सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. एनडीआरएफचे ६० जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर तैनात आहेत. तथापि खराब हवामानामुळे उड्डाण घेता येत नाही. तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून ५०० कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात आहेत. मुख्यमंत्री शिंदे साहेब परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे सुद्धा तेथे आहेत. उपमुख्यमंत्री पवार मदत कक्षात बसून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. जनतेला या दुर्घटनेबद्दल ह...