अधिक मासाचे दैवत 'भगवान पुरूषोत्तम'
अधिक मासाचे दैवत 'भगवान पुरूषोत्तम' ज्या चांद्रमहिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करीत नाही. तो अधिक महिना असतो. पृथ्वीभोवती 🌙 चंद्राची एक फेरी म्हणजे चांद्रमास. एक वर्षाच्या काळात बारा चांद्रमास पूर्ण होतात. यालाच चांद्रवर्ष असे म्हणतात. चांद्रमास हा प्रतिपदा ते अमावस्या असा २९.५ दिवसांचा असतो, त्यामूळे चांद्रवर्ष हे ३५४ दिवसांचे होते. पृथ्वीची सुर्याभोवतीची एक फेरी ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४३ सेकंदात पूर्ण होते. म्हणजेच चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. हा फरक वाढत जावून ३३ दिवसांचा निघतो. तोच अधिक मास असतो. ठराविक सण ठरावीक ॠतूत यावे हा मूळ उद्देश असतो. परंतु ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सण हे चंद्रावर अवलंबून असतात. म्हणून आपल्याकडील कालमापनात चांद्र व सौर पद्धतीचा मेळ घातलेला आहे. 366 तिथींचे एक चांद्रवर्ष होते. एका सौर वर्षाच्या काळात तशा सुमारे 371 तिथी होतात. चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा 11 तिथीने लहान असते. दरवर्षी अकरा तिथी याप्रमाणे 33 तिथी झाल्या की अधिकमास येतो. तीन वर्षात होणारा 33 दिवस...