Posts

Showing posts with the label तंत्रज्ञान

ड्रोन 🚡 तंत्रज्ञान

Image
  ड्रोन 🚡 तंत्रज्ञान            लग्नकार्य किंवा सार्वजनिक समारंभात ड्रोन कॅमेरा वापर आपण जवळून अनुभवलेला आहे. आज आपण ड्रोन म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ड्रोन उडतात, ते फोटो काढतात, वन्य प्राण्यांना वाचवतात, इतकेच काय तर भुकंपात अडकलेल्या लोकांची सुटका सुद्धा करू शकतात. मिलिटरीला दुर्गम भागात मदत करतात. ड्रोन म्हणजे कॅमेरा 📷 आणि काही सेन्सर असलेला उडणारा संगणक म्हणजे ड्रोन होय. ड्रोनला UAV म्हणजे unmanned  Aerial 🚡 vehicles किंवा Dynamic Remotely Operated Navigation 🧭 Equipment असे म्हणतात. ड्रोनला अशा ठिकाणीही सेट केले जाते, जिथे मानव पोहोचणे अशक्य आहे. ड्रोनला आकाशाचा डोळा देखील म्हटले जाते. तो अनेक काम करू शकतो. मुख्यतः अशा कामासाठी त्याला तयार केले गेले आहे जे मानवांसाठी स्वतः करणे धोकादायक आहे. मुळात हे लघु रोबोट्स आहेत, जे उडण्यास सक्षम आहेत. ज्यामध्ये ते रिमोट कंट्रोल सिस्टीमच्या मदतीने नियंत्रित केले जातात. मानवी आवाक्या बाहेरील किंवा धोकादायक आणि कठीण अशा परिस्थितीत ड्रोनचा वापर केला जातो. ड्रोन तंत्रज्ञान...