Posts

Showing posts with the label इस्त्रो

'चंद्रयान-३ LVM-3 M4' मोहिम

Image
 'चंद्रयान-३ LVM-3 M4' मोहिम           भारतीय हे जगातील संपन्न राष्ट्र म्हणून पुढे येत आहे. अंतराळ क्षेत्रातही देशाने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. ४६० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सुर्याचे पृथ्वी पासूनचे अंतर १४ कोटी ९६ लाख किलोमीटर असून सूर्याच्या प्रमंडळाचा अभ्यास करणारे यान 'आदित्य एल-वन' ची तयारी सुरू आहे. भारतीय अंतराळवीर भारतीय यानातून अवकाशात पाठविण्यासाठी 'गगनयान' पाठवण्याची योजना सुरू आहे. मंगळ ग्रहावर मोहिमेचा दुसरा टप्पा म्हणून 'मंगळयान-२' पाठवले जाणार आहे. शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी 'शुक्रयान' पाठवण्याची तयारी सुरू आहे. अवकाशातून पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी एक वेधशाळा ज्याचे नाव 'निसार' असून नासा-इस्त्रो-सिंथेटिक अपर्चर रडार झेपण्याच्या तयारीत आहे. अशा अनेक मोहिमा जगात भारताचे स्थान भक्कम करण्यासाठी तयार आहेत. देशाने 🌙 'चंद्रयान-३ LVM-3 M4' हे यान १४ जूलै २०२३ रोजी दुपारी २.३५ वाजता चंद्र 🌙 ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पाठवले आहे. त्याविषयी माहिती जाणून घेण्याचे कुतूहल सर्वांनाच आहे.           चंद्रयान...