Posts

Showing posts with the label शिक्षणाचे माहेरघर

शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे 'पुणे' कोयत्याच्या वाराने हादरले

Image
शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे 'पुणे' कोयत्याच्या वाराने हादरले           पुणे हे शिक्षणाचे माहेरघर. ती राज्याची सांस्कृतिक राजधानी. मात्र तेथील गुन्हेगारीच्या काही वाढत्या घटना पाहता पालकांच्या चिंतेत भर पडत आहे.  दर्शना पवार हत्या प्रकरणाचे घाव ताजे असतानाच आज मंगळवार दि.२७ जुन २०२३ रोजी सकाळी ०९.५५ च्या सुमारास सदाशिव पेठेत शंतनू जाधव या आरोपीने एकतर्फी प्रेमातून मुलीवर प्राणघातक हल्ला केला. गंभीर बाब म्हणजे सार्वजनिक ठिकाणी गजबजलेल्या भागात दिवसाढवळ्या त्याने हे दु:साहस करण्याचा प्रयत्न केला. जिवाच्या आकांताने ती तरूणी वाचवा वाचवा म्हणून ओरडत पळत होती. सुरूवातीला एका गणेश मंडळाच्या सहका-यांनी हल्ल्यातून तिला एकदा वाचवले. मात्र ती मुलगी पुन्हा पळाली, त्या मागोमाग आरोपीने कोयता हातात घेऊन पाठलाग केला, मात्र लोकांनी बघ्याची भुमिकाच स्विकारणे पसंत केले. अशावेळी एम.पी.एस.स्सी. चा अभ्यास करणा-या दोन जिगरबाज तरूणांनी कोणत्याही होणा-या परिणामांची चिंता न करता तिच्यावर होणारा फार मोठा अनर्थ टाळला. रस्त्यावर आडवी पडलेल्या तरूणीवर आरोपी कोयत्याचा वार करण...