Posts

Showing posts with the label राजकीय पक्ष

राजकारण आणि युवक

Image
         राजकारण आणि युवक           भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला असल्याने राजकीय पक्ष अपरिहार्य आहेत. निवडणुका आणि राजकीय पक्ष यांना आपण वेगळे करू शकत नाही. निवडणूकीच्या माध्यमातून सत्ता मिळवून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. गाव/शहर पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते संसदे पर्यंत विविध लोकप्रतिनिधी हे निवडणुकीत राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपलं नशीब अजमावत असतात.राजकीय पक्षांना विरोध असण्याचे काहीच कारण नाही. मात्र राजकारणासाठी किती वाहून घ्यायचे हे युवकांनी ठरवले पाहिजे. घरदार, कामधंदा सोडून पुढा-याच्या नादी लागलोत तर खायचे वांदे होवू नयेत, यासाठीच हा लेख प्रपंच.           लोकशाही म्हटलं की दर पाच वर्षांनी निवडणुका आल्या. संसदेत विविध राजकीय पक्षांच्या मदतीने निवडून आलेले खासदार किंवा वरिष्ठ सभागृहाचे सदस्य देशासाठी विविध कायदे तयार करण्यात मोलाचे योगदान देतात. थोडक्यात कायदेमंडळ कायदे तयार करण्याचे महत्त्वपुर्ण कार्य करते. पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती सह कार्यकारी...