फास्टफूड व जंकफूडचा जमाना
फास्टफूड व जंकफूडचा जमाना मानवी जीवनाला अन्नाची गरज असते. भूक शमविण्यासाठी खायला अन्न लागते. मात्र धकाधकीच्या जीवनात मनुष्य प्राण्याच्या खानपानाच्या पद्धतीत आमुलाग्र बदल घडून आले आहेत. सकस आहाराकडून त्याची पाऊले कधी जंकफूड, फास्टफूड कडे वळली हे त्याच्या लक्षातच आले नाही. जेंव्हा लक्षात आले तेंव्हा फार उशीर झालेला असतो. त्यामुळे जीवनात मिळालेल्या शरीररुपी अमूल्य देणगीचा योग्य विनियोग केला तर कठीण काहीच नाही, मात्र दुर्लक्ष केले तर अवघड होऊन बसेल हे निश्चित आहे. रेडी टू ईट ही संकल्पनाच घातक ठरत आहे. पुर्वी आहारात हिरव्या पालेभाज्या, वेगवेगळ्या दाळी, दुध, तुप, भात यांचे प्रमाण भरपूर होते. त्यामुळे व्हिटॅमिन, मिनरल्स, फॅट, प्रोटीनयुक्त आहार मिळायचा. अंडी, 🐔 चिकन, मटन, 🐟 मासे हे दर्जेदार स्वरूपाचे होते. अंगमेहनतीची कामं केली जात असल्याचे व सकस आहार मिळाल्याने शरीरयष्टी मजबूत होती. कोणतेही आजार सहजासहजी होत नसतं. ग्रामीण भागात तर शुद्ध पाणी ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. नदीचे, ओढ्याचे, वळणाचे, विह...