Posts

Showing posts with the label बचतगट

बचतगट-महिला सक्षमीकरणातील नांदी

Image
 बचतगट-महिला सक्षमीकरणातील नांदी            जगातील बहुतेक समाजात पितृसत्ताक कुटुंब पद्धती आढळून येते, भारतही त्यास अपवाद नाही. ज्यात पुरुष स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात. कुटुंबावर त्यांचे प्रभुत्व असते. भौतिक संसाधने आणि सामाजिक संस्थांवर पुरुषांचे नियंत्रण असते. महिलांकडे सामान्यतः आर्थिक बोजा म्हणून पाहिले जाते. त्या आपल्या कुटुंबाला, चरितार्थाला लावीत असलेला हातभार दुर्लक्षिला जातो. लिंगभावाधारीत श्रमाच्या विभागणीमूळे विषमतेची आणि श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची उतरंड निर्माण होते. येथे स्त्री आणि पुरूष यांच्या कामाचे समान मूल्यमापन होत नाही. व त्यांना दिला जाणारा मोबदला सूद्धा समान नसतो. महिलांना घरकाम तर पुरूषांना आर्थिक मोबदला मिळणारी कामे करावी लागतात. या सर्व समस्यांचे मूळ महिलांच्या आर्थिक सुबत्तेवर अवलंबून असते. यातूनच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वावलंबी बनविण्यासाठी 'बचतगट ' ही संकल्पना पुढे आली. महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यात बचतगटाची भूमिका महत्त्वाची ठरते. 'मुकी बिचारी कुणीही हाका' अशी ती अबला व शक्तीहीन न राहता स्वतःची...