Posts

Showing posts with the label लँडींग

चंद्रयान-३ 🌙 चे यशस्वी लँडींग

Image
 चंद्रयान-३  🌙 चे यशस्वी लँडींग . देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेला दिवस. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल असा दिवस म्हणजे बुधवार दि. २३ ऑगस्ट २०२३, वेळ सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटं. 🌙 चंद्रयान-३ चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 🤖 हे यशस्वीपणे पृथ्वी पासून जवळपास चार लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रावर उतरले. भारतीयांसोबतच संपूर्ण जगातील विज्ञान विश्वाचे डोळे या महत्वपूर्ण बाबीकडे लागले होते. रशिया, चीन आणि अमेरिका यांच्यानंतर भारत हा जगातील चौथा देश ठरला, ज्यांनी चंद्रावर आपली क्षमता सिद्ध केली. गर्वाची बाब म्हणजे दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. अंतराळ क्षेत्रातील आपले प्राविण्य भारताने सिद्ध केले आहे. तिरंगा अभिमानाने डौलू लागला. देशात जल्लोष साजरा:- प्रत्येक भारतीयाची नजर चंद्रयान-३ मोहिमेकडे लागली होती. चंद्रयान-२ अवघ्या २०० मीटरवर असताना त्याचा संपर्क तुटलेला अनुभव पाठीशी होता. यावेळी मात्र भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी सर्व प्रकारची खबरदारी घेतली. ज्यावेळी चंद्रावर चंद्रयान-३ चे स...