चंद्रयान-३ 🌙 चे यशस्वी लँडींग

 चंद्रयान-३  🌙 चे यशस्वी लँडींग

. देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेला दिवस. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल असा दिवस म्हणजे बुधवार दि. २३ ऑगस्ट २०२३, वेळ सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटं. 🌙 चंद्रयान-३ चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 🤖 हे यशस्वीपणे पृथ्वी पासून जवळपास चार लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रावर उतरले. भारतीयांसोबतच संपूर्ण जगातील विज्ञान विश्वाचे डोळे या महत्वपूर्ण बाबीकडे लागले होते. रशिया, चीन आणि अमेरिका यांच्यानंतर भारत हा जगातील चौथा देश ठरला, ज्यांनी चंद्रावर आपली क्षमता सिद्ध केली. गर्वाची बाब म्हणजे दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. अंतराळ क्षेत्रातील आपले प्राविण्य भारताने सिद्ध केले आहे. तिरंगा अभिमानाने डौलू लागला.

देशात जल्लोष साजरा:-

प्रत्येक भारतीयाची नजर चंद्रयान-३ मोहिमेकडे लागली होती. चंद्रयान-२ अवघ्या २०० मीटरवर असताना त्याचा संपर्क तुटलेला अनुभव पाठीशी होता. यावेळी मात्र भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी सर्व प्रकारची खबरदारी घेतली. ज्यावेळी चंद्रावर चंद्रयान-३ चे सुरक्षित लँडिंग झाले त्यावेळी शास्त्रज्ञांनी सुटकेचा विश्वास सोडला. सर्व भारतीयांची मान अभिमानाने ताठ झाली. अगदी दिवाळी सारखे 🎆 फोडण्यात आले मिठाई 🍩 वाटण्यात आली. काही ठिकाणी तर मिरवणुका काढण्यात आल्या. 

रशियाचा अयशस्वी प्रयत्न:-

चंद्रावर दक्षिणेकडे आपले यान उतरवण्यासाठी रशिया आग्रही होता. १९७६ नंतर रशियाची अंतराळ संस्था रॉसकॉसमॉस ने लूना-२५ हे यान ११ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दिशेने झेपावले. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची ती महत्वाकांक्षी योजना व रशियाला अंतराळात महाशक्ती बनविण्याचा यामागील प्रयत्न होता. २१ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रावर दक्षिण ध्रुवावर उतरणार होते, मात्र चंद्राच्या पृष्ठभागाला धडक दिल्याने लुना-२५ भरकटले व ते क्रॅश झाले.चंद्रावरिल गोठलेले पाणी आणि चंद्रावरील किंमती तत्वांचा ते शोध घेणार होते. मात्र रशियाचे प्रयत्न कमी पडले.

अतिशय कमी खर्चाची मोहीम:- 

चंद्रयान-३ ही मोहीम भारतीय शास्त्रज्ञांनी अतिशय कमी खर्चात आखली. दुसऱ्या देशांनी अगदी १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च त्यावर केला. अभिमानाने सांगावेसे वाटते की, प्रयत्नांची पराकाष्ठा करीत बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमा पेक्षाही कमी खर्चात अगदी ६१५ कोटी रुपयात ही मोहीम हाती घेण्यात आली.

मोहिमेची उद्दिष्टे:-

  • चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर सुरक्षितपणे उतरवणे. प्रगत अवकाशयान तंत्रज्ञान, स्वदेशी उपकरणे यांच्या चाचण्या घेणे. इतर ग्रहावरील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे.
  • चंद्राच्या दक्षिण भागात अब्जावधी वर्षापूर्वीची खडक आहेत. त्यांच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे. त्याद्वारे सौरमालेच्या उगमासंबंधी धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न करणे.
  • बर्फाच्या स्वरूपातील पाण्याच्या साठ्याचा शोध घेणे.

दक्षिण ध्रुवच का निवडला:-

चंद्राच्या इतर भागापेक्षा दक्षिण ध्रुवावर  तो उतरण्याचा निर्णय कारण त्याला यामागे अनेक रहस्य आहेत. दक्षिण ध्रुवावर अनेक प्रचंड मोठी विवरे आहेत त्यामुळे या भागात आतापर्यंत उतरणे एकाही देशाच्या यानाला शक्य झाले नव्हते. दक्षिण ध्रुवावरील अजस्त्र विवरांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ असल्याचे पुरावे संशोधकांना मिळालेले आहेत. बर्फाचे अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आणि तो बाहेर काढता आला तर भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. बर्फ वितळून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. शिवाय त्यांचे विघटन होऊन इंधन म्हणून हायड्रोजन आणि ऑक्सिजन निर्माण केल्या जावू शकते.


डॉ गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर

छत्रपती संभाजीनगर

Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय