जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात
जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात
जगात सगळ्यात मोठी भिंत म्हणून चीनची ओळख आहे. तर जगात सर्वाधिक उंचीची 🏢 इमारत म्हणून अमेरिकेतील संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय जे वर्जिनिया राज्यातील आर्लिंगटन शहरात असलेले 'पेंटॅगॉन' हे होते. मात्र जगात सर्वाधिक उंच बिल्डिंगचा मान अमेरिकेच्या पेंटॅगॉन' ची जागा गुजरातच्या सुरत शहरामध्ये उभारण्यात आलेल्या 'डायमंड बोर्स' या भव्य दिव्य बिल्डिंग ने पटकावला आहे. ही बिल्डिंग भारताची ओळख जगभरात पोहोचवणार आहे. गुजरात मधील सुरत शहरात हिऱ्यांची प्रसिद्ध इमारत उभी राहिली आहे. त्याची चमक इतकी आहे की साऱ्या जगात ती फैलावणार आहे. जगातील रत्नांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेली सुरतची ही इमारत 'वन स्टॉप डेस्टिनेशन' म्हणून बांधण्यात आली आहे. ही इमारत तयार करण्यासाठी पाच वर्षाचा वेळ लागला असून जवळपास ३२०० कोटी रुपये खर्च आलेला आहे. ३५ एकर विस्तीर्ण जमिनीवर बनलेली ही १५ मजली टॉवर मध्ये नऊ आयाताकृती कॉम्प्लेक्स बांधलेले असून ती सर्व सेंट्रल स्पाइनच्या स्वरूपात एकमेकांशी जोडलेली आहेत. यात १२५ लिफ्ट असून, ३०० स्क्वेअर फुटा फुटापासून ते ७५००० स्क्वेअर फुटापर्यंतचे ऑफिसेस आहेत. या इमारतीचा क्षेत्रफळ ६७ लाख स्क्वेअर फुट आहे. या बिल्डिंग चे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी ६७००० लोक बसून काम करू शकतील एवढी तिची मर्यादा आहे. या इमारतीत १३१ एलिवेटर्स, जेवण, रिटेल, वेलनेस आणि दुस-या सुविधा देखील उपलब्ध आहेत. या इमारतीत हिरे व्यवसायाशी संबंधित कटर्स, पॉलिशर्स, आणि व्यापारी वर्ग अशा सर्वांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यात केला गेला आहे. या बिल्डिंगच्या माध्यमातून जवळपास दीड लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल अशी आशा आहे. कॉन्फरन्स हॉल, क्लब, बँक्वेट हॉल, हेल्थ क्लब, आदी लक्झेरीअस परिपूर्ण सुविधा त्यात आहेत. येथे २० लाख स्क्वेअर फूट पार्किंग क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र आहे. ही इमारत उभारण्यापूर्वीच व्यावसायिकांना कार्यालये विकत घेतली आहेत. जागतिक डिझाईन स्पर्धेनंतर ही इमारत भारतीय आर्किटेक्चरल फर्म मॉर्फीजेनेसिसने तयार केली आहे. २०१३ च्या कंपनी कायद्याच्या कलम ८ अंतर्गत नोंदणीकृत आहे. एकूण शंभर प्रकारच्या हिऱ्यांपैकी या इमारतीमध्ये ९० प्रकारच्या हिऱ्यांचा कारभार होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ग्राहकांसाठी हिरे दागिन्यांच्या २७ शोरूम काढण्यात येणार आहेत. या इमारतीच्या सुरक्षेसाठी ४००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. इथे काम करणा-या प्रत्येक कर्मचाऱ्याची बायोमेट्रिक माहिती घेतली जाणार असून त्यांनाच संकुलात प्रवेश दिला जाणार आहे. येथील हिरे जगातील जवळपास १७५ देशात जातील असे व्यावसायिकांना वाटते. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हिरे सराफा बाजाराचे उद्घाटन केले जाणार आहे.
मुंबईचा दबदबा कायम राहणार:-
सुरत येथे भव्यदिव्य हिरे संकुल निर्माण करण्यात आले असले तरी मुंबईतील हि-यांची बाजारपेठ कायम राहणार आहे. मुंबईतील ओपेरा हाऊस आणि बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील डायमंड बाजारात सध्या २५०० कार्यालये आहेत. हा सध्याचा जगातील सर्वात मोठा 'डायमंड ट्रेडिंग हब' आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सर्वात मोठा प्लस पॉइंट जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा आहे. जगातील सर्वात मोठी विमानसेवा इथून कनेक्ट होते. सुरत विमानतळावरून सुरत ते शारजाह असे एकमेव आंतरराष्ट्रीय उड्डाण आहे. सुरत मध्ये सेवन स्टार 🏨 हॉटेल्स नाहीत. मुंबईचं ग्लॅमर, बीकेसी मधील दोन फाईव्ह स्टार 🏨 हॉटेल्स व पॉश एरिया आंतरराष्ट्रीय क्लाएंटला भावतो. शिवाय, बीकेसी मधील कस्टम्स क्लिअरिंग हाऊस सुद्धा महत्वपूर्ण ठरते. भारत डायमंड फोर्स आणि पंचरत्न ची माजी सेक्रेटरी नरेश मेहता यांनी मात्र सुरतची हिरे बाजारपेठ मुंबईसाठी चिंता करण्याची काहीच कारण नाही असे म्हटले आहे. त्यांच्या मतानुसार, मुंबईतील ९९ टक्के व्यापारी सुरतला जाणार नाहीत. सुरतमधील इमारत शहरापासून पंधरा किलोमीटर बाहेर आहे आणि दळणवळणासाठी योग्य सुविधा नाहीत. शिवाय 'बुलेट ट्रेन' सुरू झाल्यानंतर मुंबई-सुरत हे अंतर अगदीच कमी होणार आहे त्यामुळे मुंबईतील व्यापारी तिकडे जाण्याची शक्यता कमीच आहे. सागरीबंदर, रेल्वे वाहतूक आणि कार्यक्षम लॉजिस्टिक सपोर्ट, ६००० हून अधिक केंद्र, मोठ्या ट्रेडिंग हॉल सह मजबूत सदस्य संख्या असलेल्या मध्यम आणि लहान डायमंड निर्यात करणा-या कंपन्या ही मुंबईची खासियत आहे. बीडीडी ची मुंबई डायमंड मर्चंट्स असोशिएशन असून १४००० पेक्षा जास्त त्याचे सदस्य आहेत. विशेष बाब म्हणजे तरुण व्यापाऱ्यांचा पाया आणि करिअर मुंबई डायमंड बाजाराला वैभवशाली गरिमा प्राप्त करून देत आहे. सुरत डायमंड बॉस ने मुंबईतील व्यापाऱ्यांना सुरत मध्ये येण्यासाठी मोठ्या ऑफर्स दिलेले आहेत. जे व्यापारी २१ नोव्हेंबर पुर्वी सुरतला आपलं ऑफिस शिफ्ट करतील, त्यांना मेंटेनन्स चार्ज माफ होईल, अशी आमिष दाखविले जात आहेत. तरीही मुंबईचा यात वरचष्मा होता व राहील यात दूमत असण्याचे कारणच नाही. हिरे व्यापारात मुंबईचे स्थान 'एकमेवाद्वितीय' आहे.
मुंबई असो की सुरत जगातील ८०% हून अधिक हिरे व्यापार भारतीयच नियंत्रित करतात. बेल्जियम, एचके किंवा दुबई आणि इतर ठिकाणी भविष्यात हिरे व्यवसायाला विकासाची प्रचंड क्षमता आहे. दागिन्यांच्या निर्यातीलाही भरपूर वाव आहे. त्यामूळे हिरे आणि दागिन्यांच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. राजस्थान मधील जयपूर येथे सुद्धा डायमंड बाजार सुरू करण्याची योजना आहे. मुंबईतील बीडीडी चा त्यास पाठिंबा आहे. बीडीडी ही देशभरातील अशा अधिक डायमंड एक्सचेंजचे स्वागत आणि समर्थन करीत आहे जेणेकरून भारतीय हिरे व्यवसायाला याचा फायदा होईल आणि जागतिक बाजारपेठेत नेतृत्व करण्याची संधी देशाला मिळेल.
डॉ गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर
छत्रपती संभाजीनगर
Comments
Post a Comment