रोबोट 🤖 चे युग

 रोबोट 🤖 चे युग

        मुळात आजचे युग हे यांत्रिक युग म्हणून ओळखले जाते. यंत्र हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. सुरूवातीला माणसाने ह्या यांत्रिक प्रगतीकडे घाबरट दृष्टीने पाहिले. नंतर मात्र खुल्या दिलाने त्याचे स्वागत केले. टीव्ही 📺, वॉशिंग मशिन, फ्रीज, मिक्सर, ग्राईंडर, टेलिफोन, मोबाईल, व्हॅक्यूम क्लिनर, ओव्हन अशा अनेक गोष्टी आपल्या घरात त्यांचे स्थान बळकावून आहेत. 🏡 घरगुती कामापासून ते मोठमोठ्या कंपन्या पर्यंत सर्वत्र यंत्राचा वापर केला जातो. मानवी जीवन सुकर कसे होईल, यासाठी मानव सतत धडपडत असतो. आपण 'रोबोट', 'रावन' सारख्या चित्रपटातून २०१०, २०११ सालीच पाहिलं की, तो यंत्रमानव माणसा सारखे बोलतो, चालतो, मारामा-या करतो. हॉलिवूड मध्ये यंत्रमानवाचा वापर करून चित्रपट निर्माण झाल्याचे आपण अनुभवले. यात ते यंत्र मानवाचा मित्र असते, संकटात मदत करते, तर स्वतः वरील नियंत्रण सुटल्याने मानवावरच हल्ला करते, असे दाखवले गेले. मात्र हे आभासी जग आता प्रत्यक्षात उतरत आहे‌. हा यंत्रमानव जिवंत माणसाचा मित्र बनणार की त्याला पर्याय बनणार? अशा वेगवेगळ्या चर्चा जागतिक पातळीवर ऐकायला मिळत आहेत. कम्प्युटर मध्ये अनेक शाखा आहेत. क्लाउड कम्प्युटिंग (CC), बीग डेटा (BD), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या विविध शाखा आहेत. प्रस्तुत लेखात आपण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

एआय म्हणजे काय:-

इंग्रजीत त्याला AI-artificial intelligence म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. एआय म्हणजे स्वयंचलित यंत्र. सध्या चर्चेत असणारे आणि पुढे जाऊन मनुष्य प्राण्याचे अख्खे आयुष्य बदलणारे तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स होय. एखादा मनुष्य प्राणी कसा विचार करेल किंवा कोणत्या घटनेवर काय उत्तर देईल यासारखेच कार्य हे तंत्रज्ञान करू शकते. हा कम्प्युटर तंत्रज्ञानातील नवा उच्चांकच म्हणावा लागेल. असे यंत्र जे अगदी मानवासारखे वागेल, विचार करेल व उत्तरे देखील देईल. मानवाचे कार्य सोपे करण्यासाठी कम्प्युटरची ही शाखा महत्वपूर्ण ठरणार आहे. स्वयंचलित वाहने, बँकिंग, सैन्य, कोर्ट, अंतराळ, औद्योगिक आदी ठिकाणी हे सहजरित्या काम करू शकते. स्वयंचलित वाहनात सेन्सॉर बसवलेले असतात. ही वाहने ड्रायव्हर विना चालू शकतात. सेन्सॉरच्या मदतीने रस्त्यात खड्डा किती अंतरावर आहे, कुठे टर्न घ्यायचा आहे, किती वेळ प्रवासाला लागणार आहे, समोरून कोणती वाहने येत आहेत या सर्व बाबींची कल्पना येवू शकते. फक्त तसा प्रोग्राम सेट करावा लागतो. 🏦 बँकिंग क्षेत्रात झालेले ऑटोमोशन हे त्याचेच प्रतीक आहे. सैन्य दलात सुद्धा एआय तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. उदा. इस्त्रायल आणि हमास संघर्षात याचा वापर झाला आहे. हमास ने मिसाईल फायर केल्या. इस्त्रायलच्या सेक्यूरिटी सिस्टीमच्या रडारने पाहिले की, देशावर मिसाईल कुठे पडणार आहे. या रडारने वॉर रूम कडे त्याचे सिग्नल पाठवले. त्यामुळे पुढील धोका टाळता आला. कोर्टात सुद्धा जजेस ची भुमिका या यंत्र मानवाने भविष्यात पार पाडली तर नवल वाटायला नको. हैदराबाद मध्ये एका रेस्टॉरंट मध्ये ग्राहकांची जेवणाची ऑर्डर घेण्यासाठी यंत्रमानव उपलब्ध आहे. जपानमधील टीव्ही चॅनेलवर बातम्या देण्याचे काम यंत्र मानवाने केले आहे. सौदी अरेबिया ने तर यंत्र मानवाला २०१७ मध्येच देशाचे नागरिकत्व बहाल केले आहे. यंत्र मानवात विशेष अशी प्रोग्रॅमींग सेट केलेली आहे. त्यामूळे ग्राहकांची सेवा करताना ते गोंधळत नाहीत. तीन तासांच्या चार्जिंग वर दिवसभर काम करू शकतात. हा यंत्रमानव घरात एकटे असलेल्या आजोबांना सोबत करु शकतो. त्यांच्या सोबत गप्पा मारू शकतो. जर त्यांना आरोग्य विषयक तक्रार असेल तर योग्य ती मदत मिळवून देतो. सोसायटीच्या प्रवेश द्वारावर रखवालदाराचे काम करू शकतो. ही ड्युटी पार पाडताना काही संशयास्पद हालचाली दिसल्या तर यंत्रणांना सतर्क करून धोक्याचा इशारा देतो. रिटेल, शॉपिंग, फॅशन, स्पोर्ट्स, उत्पादन, डेटा अँनालिसीस आदी क्षेत्रात वापर करून मानवाचे कष्ट कमी करीत आहे.पहाड, समुद्र, खाण, अवकाश सह सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून येणार आहे. भविष्यातील यंत्रमानव बुद्धीमान प्राणी असणारं आहे. त्याची चुणूक जिनेव्हा मधील एआय रोबोटच्या पत्रकार परिषदेने दाखवली.

जिनिव्हा पत्रपरिषद:-

        स्वित्झरलँड मधील जिनिव्हा येथे झालेल्या जगातील पहिल्या स्मार्ट  नऊ मानवीय क🤖 रोबोटच्या पत्रकार परिषदेत 🤖 रोबोटनी सांगितले आहे की, ते मानवाविरुद्ध बंड करणार नाहीत. या पत्रकार परिषदेत सहभागी असलेले सर्व रोबो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय द्वारे चालवले जाणारे होते. यात सुमारे 3000 तज्ञ आणि 51 रोबोट आले होते. वेगवेगळ्या मुद्द्यावर पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे समर्पक आणि स्पष्ट शब्दात दिली. शांतपणे हे पत्रकार परिषदेला सामोरे गेले. या दरम्यान सोफिया नावाच्या रोबोटनी सांगितले की, 'आपण जग माणसापेक्षा चांगले चालू शकतो. आपल्याला माणसांसारख्या भावना नाहीत. वस्तुस्थितीच्या आधारे आपण कठोर निर्णय घेऊ शकतो.'

एआय मुळे मानवी नोक-या धोक्यात:-

अमेका रोबोट ला विचारण्यात आले की 'ते ज्या मानवाने त्यांना बनवले, त्यांच्याविरुद्ध बंड करतील का?' त्यावेळी अमेकाने उत्तर दिले की, 'आगामी काळात आपल्याला एआयच्या क्षेत्रातील घडामोडी बाबत सावध राहण्याची गरज आहे. यावर चर्चा व्हायला हवी.'  एईदा नावाचा चित्रकार रोबोट ने एआयची धोके पूर्णपणे नाकारले. तो म्हणाला की 'एआयला निर्बंधाची गरज नाही, तर संधीची गरज आहे. आपण माणसासोबत जगाला एक चांगले भविष्य देऊ शकतो.' देस्देमोना नावाच्या रॉकस्टार रोबोटने उत्तर देताना सांगितले की, 'माझा मर्यादांवर नाही, तर संधीवर विश्र्वास आहे. विश्र्वातील नव्या संधी शोधू आणि या जगाला नवे रूप देवू.' ग्रेस रोबोटने स्पष्टपणे नमूद केले की, 'मी मनुष्याबरोबर काम करत त्यांना सहकार्य करणार आहे. त्यांच्याऐवजी मी, असे होणार नाही'. रोबोट आयडा हा आरोग्य आणि जैवतंत्रज्ञानावर काम करण्यासाठी तयार केलेला रोबोट आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की 'माणसाचे वय 150 वरून 180 वर्षे वाढवू शकतो लोकांना याची जाणीव नाही'.

शास्त्रज्ञांनी एआयच्या धोक्यांवर चिंता व्यक्त केली:-

जिनिव्हा येथे झालेल्या रोबोटच्या पत्रकार परिषदेचा उद्देश हवामान बदल, भूक आणि सामाजिक सुरक्षा यासारख्या समस्या सोडवण्यासाठी रोबोटचा वापर करण्यावर विचार करण्यात आला. मात्र याआधी स्टीफन हॉकिंग, बिल गेट्स, इलॉन मस्क, सुंदर पिचाई यासारख्या दिग्गजांनी याबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. शास्त्रज्ञांच्या असे मत आहे की जरी एआयचा योग्य वापर केला गेला नाही तर भविष्यात ते मानवी जीवनासाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.याची काही तोटे असले तरी सुवर्णमध्य साधून मानवी विकास साधावा लागेल.


डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर

छत्रपती संभाजीनगर

Comments

Popular posts from this blog

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

बालपण हरवत चाललंय