भारताची झेप आता ☀️ सुर्याकडे
भारताची झेप आता ☀️ सुर्याकडे
चंद्रयान-३ च्या यशस्वी लॅन्डींग नंतर पुढचं टार्गेट आता 'सुर्य' ठेवण्यात आले आहे. तसं जग हे अनेक ता-यांपासून बनवलेलं आहे. जगाचं रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता जगभरातील शास्त्रज्ञांना आहे. भारत सुद्धा यात अग्रभागी आहे. सौरमालेत सुर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाखो अंश सेल्सिअस गरम असलेला आणि पृथ्वीच्या आकारापेक्षा लाखो पटींनी मोठा असणारा हा एक आगीचा गोळा आहे.सूर्याच्या पृष्ठभागावर प्रत्येक क्षणाला हजारो-लाखो विस्फोट होतात.चार्ज प्लाझ्मा, अति तापमान,आणि चुंबकीय क्षेत्रातील बदलांमुळे हे स्फोट घडतात. या स्फोटामुळे एक भयंकर वादळ निर्माण होते आणि भरपूर चार्ज झालेला प्लाझ्मा अवकाशात पसरतो. पृथ्वीच्या दृष्टीने सुर्य हा अत्यंत महत्त्वाचा गृह आहे. त्यापासून मिळणारी उष्णता आणि उर्जा अत्यंत महत्त्वाची आहे. जगातील अमेरिका, जर्मनी आणि युरोपियन स्पेस एजन्सी या तिघांनीच सुर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहिमा सुरू केल्या आहेत. भारताने पुढचे लक्ष्य 'आदित्य L1' या मोहिमेवर केंद्रित केले आहे. सुर्याचा अभ्यास करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी ही सुर्यामुळेच शक्य झाली आहे. कल्पना करू या की सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचलाच नाही तर काय होईल? तर इथे एकही जीव जगू शकणार नाही. पृथ्वीवरील उर्जेचा एकमेव स्त्रोत म्हणजे सूर्य. सौरमालेतील पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे सूर्य. सूर्याची किरणे पृथ्वीवर फक्त चार मिनिटात पोहोचतात. बाकीचे ग्रह इतके दूर आहेत की त्यांची किरणे पृथ्वीवर पोहोचायला चार वर्षे लागतात. सूर्याचा कोरोना सहज दिसू शकत नाही. सूर्यग्रहणाच्या वेळीच त्याचा अभ्यास करता येतो. या ज्वाला आपल्या संप्रेषण नेटवर्कवर आणि पृथ्वीवरील इलेक्ट्रॉनिक क्रियाकलापांवर परिणाम करतात. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी सांगितले की, 'आदित्य L1' मधून सोलर कॉरोनल इजेक्शन (सुर्याच्या वरच्या वातावरणातून निघणा-या ज्वाला) चे विश्लेषण या मोहिमेच्या माध्यमातून केले जाईल. आदित्य L-1 LMV M-3 हे यान रॉकेट द्वारे वाहून नेले जाईल. त्याला 15 लाख किलोमीटर अंतर प्रवास करून हॉलो स्पेस मध्ये थांबवले जाईल. हे यान सुर्याच्या जवळ जाणार नसून सुर्य आणि पृथ्वीच्या मध्ये पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावरून सुर्याभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. तेथूनच ते सुर्याचा अभ्यास करणार आहे. २ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.५० वाजता हे यान श्रीहरिकोटा येथून सुर्याच्या दिशेने झेपावणार आहे.
आदित्य L-1:-
इस्त्रोच्या पीएसएलव्ही अत्यंत भरवशाच्या प्रक्षेपकाद्वारे यानाची प्रक्षेपण केले जाणार आहे. व्यायामाचे वजन सुमारे १४७५ किलो असून त्यावर सात वैज्ञानिक उपकरणे (पेलोड) असणार आहेत.या मोहिमेसाठी ४५६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. अमेरिकेने याच मोहिमेसाठी बजेट १२४०० कोटी रुपये होते.
L-1:-
L-1 म्हणजे Lagrange Point One.
लॅग्रेंज पॉईंट्स हे बिंदू आहेत जे अंतराळातील दोन पिंडांमध्ये असतात. ते सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील विशिष्ट स्थान आहे.
या टप्प्यावर सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण समान आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये अवकाशात ढोबळपणे पाच ठिकाणे (पॉइंटस्) संशोधकांनी निश्चित केली आहेत की ज्या ठिकाणी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणार आहे.
येथे उपस्थित अंतराळ यान स्थिर राहतात आणि अत्यंत कमी इंधन खर्चात सुर्याचा अभ्यास करता येईल. सूर्यग्रहणाचा लॅग्रेंज पॉईंट्स या बिंदूवर कोणताही परिणाम होत नाही. येथून २४ तास कायम सूर्य स्पष्ट दिसतो. याच लॅग्रेंज पॉईंटबिंदू वरून भारताचे आदित्य एलवन सूर्याचा अभ्यास करणार आहे. फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लुई लॅग्रेंज याने 1772 मध्ये हा बिंदू शोधला होता, म्हणून त्या बिंदूला लॅग्रेंज पॉईंट असे म्हणतात. आदित्य एल वन याच लॅग्रेंज पॉईंट वरून पुढील पाच वर्ष सूर्याचा अभ्यास करणार आहे.
मोहिमेची उद्दिष्टे:-
भारताची ही पहिलीच सूर्य मोहीम आहे.
सूर्य किरणांचा पृथ्वीवर नेमका परिणाम आणि वातावरणाचा अभ्यास केला जाईल.
सूर्यावरिल आणि सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करणे.
सौर वादळे आणि चुंबकीय वादळे तसेच त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम यांचा अभ्यास समाविष्ट आहे.
सूर्यापासून अग्नी किंवा उष्णता प्रसारित होण्याआधी आणि नंतर कोणत्या क्रिया घडतात यांचा अभ्यास करणे.
पेलोड:-
अंतराळात संशोधनासाठी बनवण्यात आलेल्या उपकरणांना पेलोड किंवा उपकरणे म्हणतात. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) च्या मदतीने आदित्य L-1 यानासोबत सात (VSLC, SUITS, ASPEX, PAPA, SOLEX, HEL10S) पेलोडस् पाठवले जातील. या सात पेलोडचे वजन २४४ किलो आहे. यापैकी चार पेलोड सूर्यावर सतत लक्ष ठेवतील आणि इतर तीन पेलोड लॅग्रेंज-१ भागात असणाऱ्या कणांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करतील. आणि हे कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात कसे अडकतात हे शोधून काढतील.कोरोनल इजेक्शन सूर्याच्या काठावर कसे होत आहे आणि त्याची तीव्रता काय आहे? यामुळे सूर्याच्या हालचालींचा अंदाज घेण्याची क्षमता विकसित होवू शकते.
आव्हाने:-
लॅग्रेंज-१ भागाचे पृथ्वीपासूनचे अंतर १५ लाख किलोमीटर आहे. आदित्य L-1 ला त्या पॉइंट पर्यंत पोहोचवणे.
एवढ्या लांब अंतरावर असलेल्या यानाशी संपर्क आणि संवाद प्रस्थापित करणे.
मोहिमेसाठी लागणारा वेळ.
अशी आव्हाने असली तरी भारतीय अवकाश संशोधन संस्थेची टीम अहोरात्र त्यासाठी मेहनत घेत आहे. भारताचे अंतराळ क्षेत्रातील वर्चस्व सिद्ध करण्याची ही नामी संधी आहे.
डॉ. गणेश सागरबाई नानासाहेब गोळेकर
छत्रपती संभाजीनगर

Comments
Post a Comment