भारताची झेप आता ☀️ सुर्याकडे
भारताची झेप आता ☀️ सुर्याकडे चंद्रयान-३ च्या यशस्वी लॅन्डींग नंतर पुढचं टार्गेट आता 'सुर्य' ठेवण्यात आले आहे. तसं जग हे अनेक ता-यांपासून बनवलेलं आहे. जगाचं रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता जगभरातील शास्त्रज्ञांना आहे. भारत सुद्धा यात अग्रभागी आहे. सौरमालेत सुर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाखो अंश सेल्सिअस गरम असलेला आणि पृथ्वीच्या आकारापेक्षा लाखो पटींनी मोठा असणारा हा एक आगीचा गोळा आहे.सूर्याच्या पृष्ठभागावर प्रत्येक क्षणाला हजारो-लाखो विस्फोट होतात.चार्ज प्लाझ्मा, अति तापमान,आणि चुंबकीय क्षेत्रातील बदलांमुळे हे स्फोट घडतात. या स्फोटामुळे एक भयंकर वादळ निर्माण होते आणि भरपूर चार्ज झालेला प्लाझ्मा अवकाशात पसरतो. पृथ्वीच्या दृष्टीने सुर्य हा अत्यंत महत्त्वाचा गृह आहे. त्यापासून मिळणारी उष्णता आणि उर्जा अत्यंत महत्त्वाची आहे. जगातील अमेरिका, जर्मनी आणि युरोपियन स्पेस एजन्सी या तिघांनीच सुर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहिमा सुरू केल्या आहेत. भारताने पुढचे लक्ष्य 'आदित्य L1' या मोहिमेवर केंद्रित केले आह...