Posts

विजेचा धक्का

Image
 विजेचा धक्का            घरची 🏡 आर्थिक स्थिती अतिशय बिकट होती. काम केलं तरच चूल पेटणार होती. गयाबाई शेजारच्या सखु सोबत कपाशी निंदायला गेली. आज सुर्यनारायण जरा प्रखर वाटत होता. अंगाची लाही लाही होत होती. घामाच्या धारांनी अंग चिंब भिजले. ☁️ ढग दाटून आले. सायंकाळची वेळ झाली. पावलं घराच्या दिशेने झपाझप पडू लागली. चूलीला सरपण म्हणून बांधावरील पळाट्याचा भारा गयाबाईने डोक्यावर घेतला. ✋ हातात पाण्याला घेतलेलं कोळंब होतं. दुपारी भाकरी 🍞 खाऊन रिकामं झालेलं धुडकं, कालवणाचा तांब्या आणि थाटली सखुच्या घमेल्यात दिली. अर्धा रस्ता पार पडतो की नाही पडतो, तोच वरूणराजाने बरसायला सुरूवात केली. पावसाचा जोर वाढत होता. जवळच्या लिंबाच्या झाडाखाली दोघीजणी स्थिरावल्या. रस्त्याच्या कडेला असल्याने आणि सायंकाळी घरी जायची वेळ झाल्याने व पावसाने गाठल्याने या मोठ्या लिंबाच्या झाडाखाली आणखी बाया-माणसं आडोशाला थांबली. बाजूलाच चिमणरावचा आखाडा होता. चिमणराव आपल्या यदा या सालगड्या सोबत आऊत सोडून ऊसाच्या पाचटाने शेकारलेल्या गोठ्याजवळ जाण्याच्या बेतात होता. पाऊस उघडायचे नावंच घेत नव्ह...

रोबोट 🤖 चे युग

Image
  रोबोट 🤖 चे युग           मुळात आजचे युग हे यांत्रिक युग म्हणून ओळखले जाते. यंत्र हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. सुरूवातीला माणसाने ह्या यांत्रिक प्रगतीकडे घाबरट दृष्टीने पाहिले. नंतर मात्र खुल्या दिलाने त्याचे स्वागत केले. टीव्ही 📺, वॉशिंग मशिन, फ्रीज, मिक्सर, ग्राईंडर, टेलिफोन, मोबाईल, व्हॅक्यूम क्लिनर, ओव्हन अशा अनेक गोष्टी आपल्या घरात त्यांचे स्थान बळकावून आहेत. 🏡 घरगुती कामापासून ते मोठमोठ्या कंपन्या पर्यंत सर्वत्र यंत्राचा वापर केला जातो. मानवी जीवन सुकर कसे होईल, यासाठी मानव सतत धडपडत असतो. आपण 'रोबोट', 'रावन' सारख्या चित्रपटातून २०१०, २०११ सालीच पाहिलं की, तो यंत्रमानव माणसा सारखे बोलतो, चालतो, मारामा-या करतो. हॉलिवूड मध्ये यंत्रमानवाचा वापर करून चित्रपट निर्माण झाल्याचे आपण अनुभवले. यात ते यंत्र मानवाचा मित्र असते, संकटात मदत करते, तर स्वतः वरील नियंत्रण सुटल्याने मानवावरच हल्ला करते, असे दाखवले गेले. मात्र हे आभासी जग आता प्रत्यक्षात उतरत आहे‌. हा यंत्रमानव जिवंत माणसाचा मित्र बनणार की त्याला पर्याय बनणार? अशा वेगवेगळ्या चर्चा जाग...

टी.आर.पी. चा बागूलबुवा

Image
 टी.आर.पी. चा बागूलबुवा            टीव्ही सिरीयल्स न्यूज चॅनल पहाणा-यांना टी.आर.पी. हा परवलीचा शब्द बनला आहे. तो त्यांच्या वारंवार 👂 कानावर पडतो. आपण टीव्ही वरील मालिका, चित्रपट किंवा बातम्या पाहताना मनात विचार येतो की, टीव्हीवाल्यांची कमाई किती आणि ती कोणत्या पद्धतीने होते, या सर्व प्रश्नांची उत्तरे या ब्लॉग मधून मिळतील.  टी.आर.पी. चा अर्थ:-           इंग्रजीतील TRP:- Television rating point हा फुलफॉर्म आहे.टीव्हीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व चैनल पैकी जो चॅनल किंवा शो जास्त वेळा बघितला जातो त्यास टीआरपी म्हणतात. टीआरपी म्हणजे ठराविक लोकसंख्येच्या लोकांनी ठराविक वेळेला पाहिलेल्या कार्यक्रमाची टक्केवारी होय. हे एक उपकरण आहे.याच्या सहाय्याने कोणत्याही टी.व्ही. चॅनल पाहणारांची संख्या गणली जाते. यामुळे त्या चॅनेल ची लोकप्रियता किती आहे हे कळू शकते. ज्या चॅनलला जास्त टी.आर.पी. त्याला प्रेक्षक अधिक संख्येने पाहत आहेत, अशी प्रचिती येते. टी.आर.पी. ची माहिती जाहिरात एजन्सी करीता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. ज्या चॅनेल वर जास्त ट...

लोकसंख्येचा भस्मासुर

Image
  लोकसंख्येचा भस्मासुर                 जगात लोकसंख्येत एक नंबरवर असलेल्या चिन ला पाठीमागे टाकण्याचा आणि जगात लोकसंख्येत एक नंबर मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावाने प्रसिद्ध झाला आहे. १४४ कोटी च्या पुढे लोकसंख्या गेलेली आहे. पृथ्वीतलावर साधारणपणे पाच लाख वर्षांपासून मानवी जीवन अस्तित्वात आहे. या कालखंडात जगातील लोकसंख्येत अनेक चढउतार झाले. काही वेळा ती कमीसुद्धा झाली. नव पाषाण युगापासून ते इ.स.१९५० पर्यंत जगाची लोकसंख्या संथगतीने वाढत होती. साथीचे महाभयंकर रोगाने मोठ्या संख्येने मनुष्यहानी व्हायची. युद्ध, दुष्काळ, महापूर, भुकंप, यांसारख्या अनेक बाबींमुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असे. त्यामुळे लोकसंख्यावाढ ही समस्या होवू शकते हे मान्यच नव्हते. लोकसंख्यावाढ ही जटील समस्या भारता समोर आ वासून उभी आहे. जगाच्या लोकसंख्येच्या १७.५% भारताची लोकसंख्या आहे. परंतू भूभागाचा विचार केला तर जगाच्या केवळ २.४% भूभाग भारताच्या वाट्याला आलेला आहे. जानेवारी २०११ मधील एका अहवालानुसार भारतात प्रत्येक मिनिटाला ५१ मुलं जन्माला येतात. त्यापैकी ११ मुल...

भ्रष्टाचार; भारतीय व्यवस्थेला लागलेला कलंक

Image
 भ्रष्टाचार; भारतीय व्यवस्थेला लागलेला कलंक           भ्रष्टाचार ही भारतीय व्यवस्थेला लागलेली किड आहे. प्रत्येक नागरिकाचा भ्रष्टाचाराशी कुठे ना कुठे संबंध येतोच. सर्वच क्षेत्रात त्याची पाळेमुळे रूजलेली आहेत. हा एक समाजस्पर्शी विषय आहे. तो सर्वाचार झाला आहे. सर्व सामान्यांच्या भावना या बाबतीत बोथट झाल्या आहेत. सरकार दप्तरी असलेले आपले कोणतेही काम चिरीमिरी दिल्याशिवाय पुर्ण होतच नाही. नसता फाईल अपूर्ण आहे असा शेरा मारून फाईल उलटा प्रवास करते. काही सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या 🏠 घरातून करोडो रूपयांच्या नोटा, किलोने सोने, नांवावर कोट्यावधींच्या जमिनी, फ्लॅट, अनेक एकरांवर पसरलेले विस्तीर्ण फार्म हाऊस, महागडे बंगले, जवळच्या नातेवाईक व मित्रपरिवार यांच्या नावाने प्रोपर्टी इन्कमटॅक्सच्या किंवा ईडी च्या धाडीत सापडलेल्या आहेत. ह्या झाल्या सापडलेल्या, मग न सापडलेल्या किती असतील याची कल्पना न केलेली बरी. हा सर्वसामान्याच्या उदासिनतेचा परिपाक आहे. आपल्याला काय त्याचे? काम लवकर करायचे असेल तर द्यावेच लागतात अशी सर्वसामान्य जनतेची वाक्ये सहज 👂 कानी पडतात. सरकार...

माहितीचा अधिकार-एक प्रभावी शस्त्र

Image
 माहितीचा अधिकार-एक प्रभावी शस्त्र            इंग्रजांनी भारताची लूट करण्यासाठी गोपनीयतेचा कायदा (official secretary act) हा १९२३ मध्ये केला होता. या कायद्यामुळे कोणतीही माहिती गुप्त ठेवली जात होती. त्यामुळे प्रशासन कार्यक्षम आणि पारदर्शक बनू शकले नाही. कोणतीही गोष्ट लपवून ठेवून अन्याय व अत्याचार करण्याचे शस्त्रच प्रशासनातील लोकांना मिळाले. गोपनीयतेच्या गोंडस नावाखाली लोकशाहीचा आत्माच नष्ट झाला आणि प्रचंड भ्रष्टाचार वाढला. वास्तविकता लोकशाहीतील सरकार हे जनतेला जबाबदार असते. सरकारच्या कारभाराची जनतेला माहिती असली पाहिजे, आणि ती घेण्याचा जनतेचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेत १९(१)(अ) या तरतुदीचा ज्ञान किंवा माहिती मिळविण्याचा अधिकार हा गभितार्थ आहे. यातूनच पारदर्शक समाजाची संकल्पना उद्भवते. भ्रष्टाचार हा सर्वत्रच आहे. त्यासाठी कठोर कायदे पाहीजेत. भ्रष्टाचार नावाच्या दहातोंडी रावणाला ठार मारण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'माहितीचा अधिकार' आहे. ख-या अर्थाने हा कायदा सत्तेच्या दुरूपयोगाला विरोध करण्याचे जनतेला मिळालेले सामर्थ्य होय. या सामर्थ्याचे महत्व ओळखत...