Posts

शेती आणि 🚡 ड्रोन तंत्रज्ञान

Image
शेती  आणि  🚡   ड्रोन तंत्रज्ञान           शेती करणे हे अतिशय कष्टाचे काम आहे. शिवाय मजूर मिळणे ही कठीण बाब झाली आहे. मिळाले तर जास्तीची मजुरी मागतात. वेळेवर कामे केली नाहीत तर प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. पीक फवारणी वेळेत झाली नाही तर पिकावर जास्तीचा रोग फैलावतो. वेळेवर कामे करावयाची असतील तर तंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागेल. कमी कष्टात आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर अनेक प्रयत्न सुरु आहेत. कमी काळात अधिक प्रभावी वापर व जास्तीतजास्त लाभ घेण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान हे अतिशय उपयुक्त ठरत आहे. केंद्र-राज्याचा हातभार ,  सहकार क्षेत्राचे योगदान आणि जनतेचा उदंड सहभाग हे ड्रोन वापरातील मैलाचा दगड ठरणार आहे. शेतीसाठी ड्रोनचा वापर शेतकर्‍यांसाठी आदिक किफायतशीर मानला जातो. जास्तीचे उत्पादन मिळवत अॅग्रोकेमिकल्स ,  खते ,  फवारणी यामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते. D RONE  चे  विविध शब्दाचे संक्षिप्तरूप आहे:- D ( डी ) – डायनॅमिक   R ( आर ) – दूरस्थपणे O ( ओ ) – ऑपरेट केलेले N ...

ड्रोन 🚡 तंत्रज्ञान

Image
  ड्रोन 🚡 तंत्रज्ञान            लग्नकार्य किंवा सार्वजनिक समारंभात ड्रोन कॅमेरा वापर आपण जवळून अनुभवलेला आहे. आज आपण ड्रोन म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ड्रोन उडतात, ते फोटो काढतात, वन्य प्राण्यांना वाचवतात, इतकेच काय तर भुकंपात अडकलेल्या लोकांची सुटका सुद्धा करू शकतात. मिलिटरीला दुर्गम भागात मदत करतात. ड्रोन म्हणजे कॅमेरा 📷 आणि काही सेन्सर असलेला उडणारा संगणक म्हणजे ड्रोन होय. ड्रोनला UAV म्हणजे unmanned  Aerial 🚡 vehicles किंवा Dynamic Remotely Operated Navigation 🧭 Equipment असे म्हणतात. ड्रोनला अशा ठिकाणीही सेट केले जाते, जिथे मानव पोहोचणे अशक्य आहे. ड्रोनला आकाशाचा डोळा देखील म्हटले जाते. तो अनेक काम करू शकतो. मुख्यतः अशा कामासाठी त्याला तयार केले गेले आहे जे मानवांसाठी स्वतः करणे धोकादायक आहे. मुळात हे लघु रोबोट्स आहेत, जे उडण्यास सक्षम आहेत. ज्यामध्ये ते रिमोट कंट्रोल सिस्टीमच्या मदतीने नियंत्रित केले जातात. मानवी आवाक्या बाहेरील किंवा धोकादायक आणि कठीण अशा परिस्थितीत ड्रोनचा वापर केला जातो. ड्रोन तंत्रज्ञान...

जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात

Image
  जगातील सर्वात मोठी 🏢 इमारत आता भारतात             जगात सगळ्यात मोठी भिंत म्हणून चीनची ओळख आहे. तर जगात सर्वाधिक उंचीची 🏢 इमारत म्हणून अमेरिकेतील संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय जे वर्जिनिया राज्यातील आर्लिंगटन शहरात असलेले 'पेंटॅगॉन' हे होते. मात्र जगात सर्वाधिक उंच बिल्डिंगचा मान अमेरिकेच्या पेंटॅगॉन' ची जागा गुजरातच्या सुरत शहरामध्ये उभारण्यात आलेल्या 'डायमंड बोर्स' या भव्य दिव्य बिल्डिंग ने पटकावला आहे. ही बिल्डिंग भारताची ओळख जगभरात पोहोचवणार आहे. गुजरात मधील सुरत शहरात हिऱ्यांची प्रसिद्ध इमारत उभी राहिली आहे. त्याची चमक इतकी आहे की साऱ्या जगात ती फैलावणार आहे. जगातील रत्नांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेली सुरतची ही इमारत 'वन स्टॉप डेस्टिनेशन' म्हणून बांधण्यात आली आहे.  ही इमारत तयार करण्यासाठी पाच वर्षाचा वेळ लागला असून जवळपास ३२०० कोटी रुपये खर्च आलेला आहे. ३५ एकर विस्तीर्ण जमिनीवर बनलेली ही १५ मजली टॉवर मध्ये नऊ आयाताकृती कॉम्प्लेक्स बांधलेले असून ती सर्व सेंट्रल स्पाइनच्या स्वरूपात एकमेकांशी जोडलेली आहेत. यात १२५ लिफ्ट असून, ३०० स्...

सोशल मीडियाची चटक वाढतेय

Image
  सोशल मीडियाची चटक वाढतेय           सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असले तरी त्याचा अतिरेकी वापर वाढल्याने मानवास विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा . मात्र बदलत्या काळानुसार मोबाईल आणि सोशल मीडिया ही सुद्धा आणखी एक गरज बनत आहे. हे मी सांगत नाही तर जागतिक पातळीवरील एका सर्व्हेतून समोर आलेले आहे. आज महालापासून ते झोपडी पर्यन्त सर्वांना मोबाईल लागतोच. नव्हे तो आहेच. उपरोधाने आपण म्हणत होतो की मोबाइल जिवनावश्यक आहे, आत्ता तर ते खरे निघत आहे. झोपेतून उठल्या उठल्या पहिल्यांदा मनुष्य काय शोधत असेल तर तो मोबाईल. मग तो किती वाजले हे पाहण्यासाठी असो, व्हाट्सअप मेसेजेस चेक करण्यासाठी असो किंवा इतर कोणत्याही बाबींसाठी असो. कोणी काय स्टेटस ठेवले किंवा आपणास काय स्टेटस ठेवायचे हे बरेच जण झोपेतून जागे झालेकीच ठरवतात. पहिले 'बेड टी' ला नांवे ठेवली जात. आत्ता त्याच्याही अगोदर मोबाईलच्या माध्यमातून सोशिअल मिडियाचा प्रभावी वापर सुरू आहे. अनेक मोबाईल कंपन्यांनी सुरूवातीला फ्री डेटा देवून इंटरनेट वापरण्याची सवय अंगवळ...

पेटलेलं मणिपूर

Image
 पेटलेलं  मणिपूर मणिपूर मध्ये कंगपोकपी जिल्ह्यातील गावात दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना अंगावर काटा आणते. त्यांच्या शरीराला विचित्र पद्धतीने हात लावला जातोय, हे खूप भयंकरच्या पलिकडे आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. या दुर्दैवी घटनेमूळे सर्वत्र खळबळ माजली आहे. त्याहून गंभीर म्हणजे ४ मे ची ही घटना असून आत्तापर्यंत त्यावर कोणतीही कठोर कारवाई झाली नाही. म्हणजे जवळपास ७७ दिवस या प्रसंगावर चूप्पी साधली होती. कोणताही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया त्यावर बोलायला तयार नव्हता. जेंव्हा सामाजिक माध्यमातून हे वास्तव बाहेर आले, तेंव्हा लोकांच्या मनात व्यवस्थेविषयी चिड निर्माण झाली. त्या महिला कोणत्या जातीच्या किंवा धर्माच्या होत्या हा प्रश्न महत्त्वाचा नसून सर्वप्रथम त्या महिला आहेत.   ही घटना पाहूनही आपले मन विचलित होत नसेल तर आपण पशु बनलोय, हे मात्र नक्की खरे आहे. कर्तृत्ववान स्त्रियांचा वारसा सांगणाऱ्या या देशात जर स्त्रियांची अशा प्रकारे 'धिंड' काढले जात असेल तर येणारा का...

दरडी का कोसळतात?

Image
  दरडी का कोसळतात?           रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ईर्शाळवाडी गावातील आदिवासी वसाहतीवर मध्यरात्री मोठी दरड कोसळल्याची हृदयद्रावक घटना घडली. आत्तापर्यंत या घटनेमध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ९८ जणांना वाचविण्यात यश आले आहे. अजूनही हा आकडा वाढण्याची भीती आहे. गेल्या ३ दिवसात सुमारे ४९९ मिमी पाऊस झाला असून सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. एनडीआरएफचे ६० जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर तैनात आहेत. तथापि खराब हवामानामुळे उड्डाण घेता येत नाही. तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून ५०० कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात आहेत. मुख्यमंत्री शिंदे साहेब परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे सुद्धा तेथे आहेत. उपमुख्यमंत्री पवार मदत कक्षात बसून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. जनतेला या दुर्घटनेबद्दल ह...