Posts

भारताची झेप आता ☀️ सुर्याकडे

Image
  भारताची झेप आता ☀️ सुर्याकडे           चंद्रयान-३ च्या यशस्वी लॅन्डींग नंतर पुढचं टार्गेट आता 'सुर्य' ठेवण्यात आले आहे. तसं जग हे अनेक           ता-यांपासून बनवलेलं आहे. जगाचं रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता जगभरातील शास्त्रज्ञांना आहे. भारत सुद्धा यात अग्रभागी आहे. सौरमालेत सुर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाखो अंश सेल्सिअस गरम असलेला आणि पृथ्वीच्या आकारापेक्षा लाखो पटींनी मोठा असणारा हा एक आगीचा गोळा आहे.सूर्याच्या पृष्ठभागावर प्रत्येक क्षणाला हजारो-लाखो विस्फोट होतात.चार्ज प्लाझ्मा, अति तापमान,‌आणि चुंबकीय क्षेत्रातील बदलांमुळे हे स्फोट घडतात. या स्फोटामुळे एक भयंकर वादळ निर्माण होते आणि भरपूर चार्ज झालेला प्लाझ्मा अवकाशात पसरतो. पृथ्वीच्या दृष्टीने सुर्य हा अत्यंत महत्त्वाचा गृह आहे. त्यापासून मिळणारी उष्णता आणि उर्जा अत्यंत महत्त्वाची आहे. जगातील अमेरिका, जर्मनी आणि युरोपियन स्पेस एजन्सी या तिघांनीच सुर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाश मोहिमा सुरू केल्या आहेत. भारताने पुढचे लक्ष्य 'आदित्य L1' या मोहिमेवर केंद्रित केले आह...

चंद्रयान-३ 🌙 चे यशस्वी लँडींग

Image
 चंद्रयान-३  🌙 चे यशस्वी लँडींग . देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेला दिवस. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावेल असा दिवस म्हणजे बुधवार दि. २३ ऑगस्ट २०२३, वेळ सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटं. 🌙 चंद्रयान-३ चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 🤖 हे यशस्वीपणे पृथ्वी पासून जवळपास चार लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रावर उतरले. भारतीयांसोबतच संपूर्ण जगातील विज्ञान विश्वाचे डोळे या महत्वपूर्ण बाबीकडे लागले होते. रशिया, चीन आणि अमेरिका यांच्यानंतर भारत हा जगातील चौथा देश ठरला, ज्यांनी चंद्रावर आपली क्षमता सिद्ध केली. गर्वाची बाब म्हणजे दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. अंतराळ क्षेत्रातील आपले प्राविण्य भारताने सिद्ध केले आहे. तिरंगा अभिमानाने डौलू लागला. देशात जल्लोष साजरा:- प्रत्येक भारतीयाची नजर चंद्रयान-३ मोहिमेकडे लागली होती. चंद्रयान-२ अवघ्या २०० मीटरवर असताना त्याचा संपर्क तुटलेला अनुभव पाठीशी होता. यावेळी मात्र भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी सर्व प्रकारची खबरदारी घेतली. ज्यावेळी चंद्रावर चंद्रयान-३ चे स...

जेनेरिक औषधे

Image
 जेनेरिक औषधे जेनेरिक औषधे म्हणजे ब्रॅन्डेड नेसलेली, स्वस्त पण दर्जेदार औषधे. जेनेरिक औषधांच्या बाबतीत सर्वसामान्य जनतेला फारशी माहिती नाही. प्रिस्क्रिप्शन लिहून देणारे डॉक्टर जेनेरिक औषधे पेशंटला लिहून देत नाहीत. मेडिकल स्टोअर्स वाले जेनेरिक औषधे ठेवत नाहीत. त्यामुळे स्वस्त असूनही जेनेरिक औषधे सर्वसामान्यांपासून दूर आहेत. आपण जेनेरिक औषधांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मानवाच्या जन्माअगोदर पासून ते मृत्यू पर्यंत औषधाचा अतिशय जवळचा संबंध आहे. औषधं हा अन्न, वस्त्र, निवारा सारखाच जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. देशात, जगात औषधी न वापरणारा मनुष्य सापडले दुर्मिळ आहे. मानवा बरोबरच पाळीव प्राण्यांच्या जीवनाची वाटचाल सुद्धा औषधांकडे केंव्हाच पोहोचली आहे. साध्या सर्दी, खोकला, ताप पासून ते अतिशय कठीण शस्त्रक्रियेसाठी औषधी लागतेच. पुर्वी 🌲 झाड- पाला, वनस्पती, कंदमुळे, वेली, त्यापासून मिळणारे रस अशा विविध बाबी औषधी म्हणूनच वापरल्या जात. 'आजीबाईचा बटवा' हा अत्यंत गुणकारी आणि प्रसिद्ध होता. जसं विज्ञान प्रगत होत गेले, त्याप्रमाणे औषधांचे स्वरूप बदलले. अभ्यास आणि संशोधनानंतर औषध...

'चंद्रयान-३ LVM-3 M4' मोहिम

Image
 'चंद्रयान-३ LVM-3 M4' मोहिम           भारतीय हे जगातील संपन्न राष्ट्र म्हणून पुढे येत आहे. अंतराळ क्षेत्रातही देशाने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. ४६० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सुर्याचे पृथ्वी पासूनचे अंतर १४ कोटी ९६ लाख किलोमीटर असून सूर्याच्या प्रमंडळाचा अभ्यास करणारे यान 'आदित्य एल-वन' ची तयारी सुरू आहे. भारतीय अंतराळवीर भारतीय यानातून अवकाशात पाठविण्यासाठी 'गगनयान' पाठवण्याची योजना सुरू आहे. मंगळ ग्रहावर मोहिमेचा दुसरा टप्पा म्हणून 'मंगळयान-२' पाठवले जाणार आहे. शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी 'शुक्रयान' पाठवण्याची तयारी सुरू आहे. अवकाशातून पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी एक वेधशाळा ज्याचे नाव 'निसार' असून नासा-इस्त्रो-सिंथेटिक अपर्चर रडार झेपण्याच्या तयारीत आहे. अशा अनेक मोहिमा जगात भारताचे स्थान भक्कम करण्यासाठी तयार आहेत. देशाने 🌙 'चंद्रयान-३ LVM-3 M4' हे यान १४ जूलै २०२३ रोजी दुपारी २.३५ वाजता चंद्र 🌙 ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पाठवले आहे. त्याविषयी माहिती जाणून घेण्याचे कुतूहल सर्वांनाच आहे.           चंद्रयान...

शेती आणि 🚡 ड्रोन तंत्रज्ञान

Image
शेती  आणि  🚡   ड्रोन तंत्रज्ञान           शेती करणे हे अतिशय कष्टाचे काम आहे. शिवाय मजूर मिळणे ही कठीण बाब झाली आहे. मिळाले तर जास्तीची मजुरी मागतात. वेळेवर कामे केली नाहीत तर प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. पीक फवारणी वेळेत झाली नाही तर पिकावर जास्तीचा रोग फैलावतो. वेळेवर कामे करावयाची असतील तर तंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागेल. कमी कष्टात आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर अनेक प्रयत्न सुरु आहेत. कमी काळात अधिक प्रभावी वापर व जास्तीतजास्त लाभ घेण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान हे अतिशय उपयुक्त ठरत आहे. केंद्र-राज्याचा हातभार ,  सहकार क्षेत्राचे योगदान आणि जनतेचा उदंड सहभाग हे ड्रोन वापरातील मैलाचा दगड ठरणार आहे. शेतीसाठी ड्रोनचा वापर शेतकर्‍यांसाठी आदिक किफायतशीर मानला जातो. जास्तीचे उत्पादन मिळवत अॅग्रोकेमिकल्स ,  खते ,  फवारणी यामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते. D RONE  चे  विविध शब्दाचे संक्षिप्तरूप आहे:- D ( डी ) – डायनॅमिक   R ( आर ) – दूरस्थपणे O ( ओ ) – ऑपरेट केलेले N ...

ड्रोन 🚡 तंत्रज्ञान

Image
  ड्रोन 🚡 तंत्रज्ञान            लग्नकार्य किंवा सार्वजनिक समारंभात ड्रोन कॅमेरा वापर आपण जवळून अनुभवलेला आहे. आज आपण ड्रोन म्हणजे नेमके काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ड्रोन उडतात, ते फोटो काढतात, वन्य प्राण्यांना वाचवतात, इतकेच काय तर भुकंपात अडकलेल्या लोकांची सुटका सुद्धा करू शकतात. मिलिटरीला दुर्गम भागात मदत करतात. ड्रोन म्हणजे कॅमेरा 📷 आणि काही सेन्सर असलेला उडणारा संगणक म्हणजे ड्रोन होय. ड्रोनला UAV म्हणजे unmanned  Aerial 🚡 vehicles किंवा Dynamic Remotely Operated Navigation 🧭 Equipment असे म्हणतात. ड्रोनला अशा ठिकाणीही सेट केले जाते, जिथे मानव पोहोचणे अशक्य आहे. ड्रोनला आकाशाचा डोळा देखील म्हटले जाते. तो अनेक काम करू शकतो. मुख्यतः अशा कामासाठी त्याला तयार केले गेले आहे जे मानवांसाठी स्वतः करणे धोकादायक आहे. मुळात हे लघु रोबोट्स आहेत, जे उडण्यास सक्षम आहेत. ज्यामध्ये ते रिमोट कंट्रोल सिस्टीमच्या मदतीने नियंत्रित केले जातात. मानवी आवाक्या बाहेरील किंवा धोकादायक आणि कठीण अशा परिस्थितीत ड्रोनचा वापर केला जातो. ड्रोन तंत्रज्ञान...