शेती आणि 🚡 ड्रोन तंत्रज्ञान
शेती आणि 🚡 ड्रोन तंत्रज्ञान शेती करणे हे अतिशय कष्टाचे काम आहे. शिवाय मजूर मिळणे ही कठीण बाब झाली आहे. मिळाले तर जास्तीची मजुरी मागतात. वेळेवर कामे केली नाहीत तर प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. पीक फवारणी वेळेत झाली नाही तर पिकावर जास्तीचा रोग फैलावतो. वेळेवर कामे करावयाची असतील तर तंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागेल. कमी कष्टात आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर अनेक प्रयत्न सुरु आहेत. कमी काळात अधिक प्रभावी वापर व जास्तीतजास्त लाभ घेण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान हे अतिशय उपयुक्त ठरत आहे. केंद्र-राज्याचा हातभार , सहकार क्षेत्राचे योगदान आणि जनतेचा उदंड सहभाग हे ड्रोन वापरातील मैलाचा दगड ठरणार आहे. शेतीसाठी ड्रोनचा वापर शेतकर्यांसाठी आदिक किफायतशीर मानला जातो. जास्तीचे उत्पादन मिळवत अॅग्रोकेमिकल्स , खते , फवारणी यामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होते. D RONE चे विविध शब्दाचे संक्षिप्तरूप आहे:- D ( डी ) – डायनॅमिक R ( आर ) – दूरस्थपणे O ( ओ ) – ऑपरेट केलेले N ...