Posts

Showing posts from June, 2023

व्यसन 📱 मोबाईलचे

Image
 व्यसन 📱 मोबाईलचे            पुर्वी मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा होत्या. त्यात मोबाईल ही चौथी गरज आजच्या काळात वाढली. मोबाईल मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. कारण जवळ मोबाईल नसला की काही तरी हरवल्या सारखे अनेकांना वाटते. मोबाईलचा वापर सकाळी उजाडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत होता. सकाळी गुडमॉर्निंग पासून याची सुरुवात होते. दुध वाल्याला उशीर झाला तर त्याला 🤙 कॉल केला जातो. दाढी-कटींग करायची असेल तर नाव्ह्याकडे किती नंबर आहेत, याची चाचपणी केली जाते. किराणा मालाचे पैसे फोन- पे वरून अदा केले जातात. घरी कोणी आजारी असेल तर डॉक्टरांकडे नंबर लावण्यासाठी त्याचा वापर होतो. नविन माहिती त्याद्वारे मिळते. सणावारांच्या शुभेच्छा याद्वारे दिल्या जातात. मनोरंजनाचे साधन म्हणून त्याकडे पाहिले जाते. लहानग्यांच्या अंगाई पासून ते वयस्करांचे आवडते किर्तन-भजन ऐकता येते. तरूणाईची आवड असलेले सिनेमे, गाणे ऐकता येते. प्रवास करायचा असेल आणि रस्ता माहित नसेल तर गुगल मॅप द्वारे सहज तेथे पोहोचता येते. अभ्यास करताना सुद्धा तो उपयोगी पडतो. लॉकडाउन काळा...

झळा दुष्काळाच्या

Image
 झळा दुष्काळाच्या            आपण भाग्यवान आहोत, दुष्काळाच्या झळा जाणवत नाहीत. आपल्या पिढीने दुष्काळ अनुभवला नाही. मात्र ज्यांचे वय साठपेक्षा जास्त आहे, त्यांनी १९७२ चा महाभयंकर दुष्काळ अनुभवला आहे. आज पिण्यास पाणी मुबलक आहे. हरितक्रांती झाल्याने अन्नधान्य भरपूर आहे. आपण ३०% अन्नाची नासाडी करतो. भुक आहे तेवढेच ताटात घेतले पाहिजे. सर्व असताना त्याची किंमत आपल्याला करता येत नाही. दुष्काळ काय असतो, त्याची तीव्रता किती होती यावरून निश्चित बोध घेता येईल.           दोन वर्षात पाऊस कमीच झाला.तिस-या वर्षी १९७२ मध्ये परिस्थितीच पालटली. कोरड्या दुष्काळामुळे सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. साधारणपणे वर्षभर पुरेल इतका धान्याचा साठा सर्वांकडे असायचा. मात्र दोन वर्षातील कमी पावसाने ती संधी सुद्धा हिरावून घेतली. शेतातील उभं पिक जळून गेल होतं. प्यायला पाणी नाही की खायला अन्न नाही अशी अन्नान दशा झाली. माणसांनाच खायला नाही म्हटल्यावर जनावरे कशी जगवायची, असा यक्ष प्रश्न होता. अन्न पाण्यावाचून गोठ्यातील जनावरे पटापटा मरून जात होती. दुष्काळा...

शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे 'पुणे' कोयत्याच्या वाराने हादरले

Image
शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे 'पुणे' कोयत्याच्या वाराने हादरले           पुणे हे शिक्षणाचे माहेरघर. ती राज्याची सांस्कृतिक राजधानी. मात्र तेथील गुन्हेगारीच्या काही वाढत्या घटना पाहता पालकांच्या चिंतेत भर पडत आहे.  दर्शना पवार हत्या प्रकरणाचे घाव ताजे असतानाच आज मंगळवार दि.२७ जुन २०२३ रोजी सकाळी ०९.५५ च्या सुमारास सदाशिव पेठेत शंतनू जाधव या आरोपीने एकतर्फी प्रेमातून मुलीवर प्राणघातक हल्ला केला. गंभीर बाब म्हणजे सार्वजनिक ठिकाणी गजबजलेल्या भागात दिवसाढवळ्या त्याने हे दु:साहस करण्याचा प्रयत्न केला. जिवाच्या आकांताने ती तरूणी वाचवा वाचवा म्हणून ओरडत पळत होती. सुरूवातीला एका गणेश मंडळाच्या सहका-यांनी हल्ल्यातून तिला एकदा वाचवले. मात्र ती मुलगी पुन्हा पळाली, त्या मागोमाग आरोपीने कोयता हातात घेऊन पाठलाग केला, मात्र लोकांनी बघ्याची भुमिकाच स्विकारणे पसंत केले. अशावेळी एम.पी.एस.स्सी. चा अभ्यास करणा-या दोन जिगरबाज तरूणांनी कोणत्याही होणा-या परिणामांची चिंता न करता तिच्यावर होणारा फार मोठा अनर्थ टाळला. रस्त्यावर आडवी पडलेल्या तरूणीवर आरोपी कोयत्याचा वार करण...

बारावी नंतरचे करीअर

Image
 बारावीचे नंतर  करीअर           शैक्षणिक जीवनात बारावीचे वर्ष आणि वय या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वपूर्ण ठरतात. करीअर निवडण्यासाठी हे योग्य वय आहे. तर शिक्षणाचा करिअर निवडण्याचा योग्य बेस हा बारावीच ठरतो. आयुष्यातील टर्निंग पॉइंट असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. बहुतांश पालकाचे स्वप्न असते की, पाल्याने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे. अतिशय चांगली संकल्पना आहे. मेडिकल, इंजिनिअरींग ला प्रवेश मिळत असेल तर चांगलेच. दोन्ही क्षेत्रात चांगले कोर्सेस आहेत, ज्या आधारावर विद्यार्थ्यांना स्वतः च्या पायावर उभे राहण्याची नामी संधी मिळते.एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., एम.डी., एम.एस., असे विविध टप्प्यांवरील शिक्षण पूर्ण करीत डॉक्टर होता येते. इंजिनिअर मध्ये अनेक दर्जेदार स्वरूपाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. याशिवाय आणखी विविध पर्याय आहेत, त्याचाही विचार करायला काहीच हरकत नाही.            बी.एस्सी.ॲग्री हा सुद्धा एक पर्याय होवू शकतो. शेती किंवा शेती संलग्न क्षेत्रावर नाविण्यपूर्ण कामगिरी करण्याची संधी याद्वारे प्राप्त होते. ल...

मजाक जिवावर बेतू शकतो

Image
          मजाक जिवावर बेतू शकतो             नेमकाच पाडवा झाला होता. सुगीचे दिवस सुरू होते. सुभानराव च्या रानातील जेवारी  काढणी सुरू करून दहा दिवस झाले. जेवारीची पसार रानात पसरलेली होती. पेंढ्या बांधून झाल्या. कणसं खुडणीला उद्या मंगळवारी सुरू करणार होते. आज सोमवार प्रचंड उकाडा जाणवत होता. तिन्ही सांजची येळ झाली. झाकडं पडत आलं. सुर्यनारायण केंव्हाच मावळतीला गेला. रानातल्या बाया कवाच घरी पवचल्या. चुलीवर भाकरी थापल्याचे 'थप थप' आवाज कानावर ऐकू येवू लागले. सरपण ओलसर असल्याने भागामायची चूल पेटतच नव्हती. फुकणीने फूकन फूकून पार तिचं डोळे लालेलाल झाले. लाकडं पुढ सरकवली जात होती. आता कुठं जाळाने पेट घेतला. भाकरी संपून तिनं पाटा-वरवटा हाती घेतला. काळं वाटण वाटून वांग्याचे कालवण करण्याचा बेत होता. सुभानराव कडे पाच सालकरी होते. शामरावने बैलाला वैरण टाकली. सुगी असल्याने आखाडा जेवारी च्या रानात टाकलेला होता. इतर तिघेजण तिथंच बाजूला कलंडले. आज दामुअण्णा चा गावात भाकरी आणण्यासाठी जाण्याचा नंबर होता. दामुअण्णा जरा घाबरटच. तो कायम कोणाच्या न...

दहावी नंतरच्या करिअरच्या वाटा

Image
 दहावी नंतरच्या करिअरच्या वाटा           पैसा हाच उद्देश करिअरच्या बाबतीत नसावा तर आपल्या अंगी असलेले कौशल्य, ज्ञान याचाही महत्त्वाचा रोल ठरतो. त्या क्षेत्रातील आव्हाने काय आहेत, मर्यादा कोणत्या आहेत याचाही विचार करिअर निवडताना केला पाहिजे. नुकतेच दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले. त्यात काहींना समाधानकारक गुण संपादन करता आले. तर काहींची अपेक्षापूर्ती झाली नाही. मुळात या गुणांवर आधारित कोणतेही कोर्सेस राहिले नाहीत, काही अपवाद सोडले तर. प्रत्येकाची एक वेगळी चाचणी परीक्षा आहे. त्यामुळे त्या वर्गात या चाचणीसाठी पात्र ठरु एवढे गुण असले तरी पुरेसे आहेत. प्रत्येक आई-वडिलांचे एक स्वप्न असते. आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर किंवा इंजिनिअर झाले पाहिजेत. त्यांची अपेक्षा पालक म्हणून रास्त आहे. आपल्याला जे मिळाले नाही, त्यापेक्षा अधिक लावण्याची पालकांची तयारी असते. मात्र सर्वांना ते शक्य नाही. त्यामुळे अजिबात निराश व्हायचे कारण नाही. डॉक्टर किंवा इंजिनिअर होवून जे करता येणार नाही, मिळवता येणार नाही, त्याही पेक्षा दर्जेदार आण...

तिची चूक काय होती?

Image
 तिची चूक काय होती?           दर्शना पवार नावाची साखर कारखान्यातील एका ड्रायव्हरची खेडेगावातील मुलगी. MPSC परिक्षेत राज्यात तिसरी येत "तिने रेंज फॉरेस्ट ऑफिसर" ची पोस्ट काढली. गावात सत्काराचे मिरवणूक काढण्यात आली. सर्वत्र तिला सत्काराला बोलावणं येवू लागलं. अशातच राहुल हंडोरे या ओळखीच्या तरुणाने ट्रेकिंग च्या बहाण्याने १२ जून रोजी राजगडाकडे दुचाकीवरून नेले. तिथेच घात झाला. प्राथमिक माहिती नुसार लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर हल्ला केला. गुराख्यांना वेल्हे तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याशी कुजलेला मृतदेह आढळला. 'फादर्स डे' दिवशी तिच्या वडिलांना मृतदेह ओळखण्याचे दुर्दैवी काम करावे लागले. यात तिची चूक कोणती? जगात नसल्याने गेल्या सात-आठ दिवसांपासून अनेकांनी तिलाच आरोपीच्या कटघ-यात उभे केले. एक तर आरोपांना उत्तर द्यायला ती जिवंत नाही. अनेकांनी तर तिच्यावर वाट्टेल ते आरोप केले, काहींनी तोंडसुख घेतले. ती तिथे का गेली? लग्नास नकार का दिला? अशा प्रश्नांची सरबत्ती तिच्यावर करण्यात आली.            वडील साखर कारखान्यात ड्रायव्हर...

नकार पचावायला शिका

Image
 नकार पचावायला शिका           एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले. औद्योगिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, सामाजिक अशा विविध बदलांमुळे जग जवळ आलं. जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत यापुढे जावून मानवतेच्या पातळीवर व्यवहार सुरू झाले. स्त्री-पुरूष समानतेचे वारे वाहू लागले. शिक्षणामूळे मुला-मुलींना घरापासून, आई-वडीलांपासून दूर राहावे लागले. शालेय, महाविद्यालयीन जीवनात मुला-मुलात, मुली-मुलीत जवळीकता वाढून मैत्री निर्माण झाली. मुला-मुलीतही मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले, जे काळानुरूप आवश्यक होते. मात्र यातून काही गैरप्रकार समोर आले. ज्यामुळे आई-वडीलांच्या समोर गंभीर प्रश्न निर्माण झाले. दर्शना पवार ची झालेली हत्या हे त्याचेच प्रतीक ठरते. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते. मात्र वेळप्रसंगी समोरून नकार असेल तर तो पचवण्याचे औदार्य मुलाने किंवा मुलीने दाखवले पाहिजे. यातून त्याचा/तिचा बळी तर जातोच शिवाय घरच्यांचे हाल होतात.              शहरी भागातील पालक राहतात त्या ठिकाणी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी किमान सोबत तरी असतात. त्यां...

व्यथा बळीराजाची

Image
                           व्यथा बळीराजाची            भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील साठ ते सत्तर टक्के लोक आजही ग्रामीण भागात राहतात.त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. स्वतः अठरा तासांपेक्षा अधिक राबून अन्नधान्याचे प्रचंड उत्पादन घेतो. इतरांना खाण्याची सोय करतो, मात्र त्याला अर्धपोटी राहावे लागते. प्रसंगी उपाशीपोटी झोपावे लागते. याला जबाबदार कोण? स्वातंत्र्याच्या वेळी ३३ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात अन्नधान्याचा तुटवडा होता. आजमितीला १३५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला पुरवून सुद्धा त्याची अनेक देशांत निर्यात केली जाते. म्हणजे शेतजमीन तर वाढली नाही. उलट धरणं, औद्योगिक वसाहती, घरे किंवा विविध बाबीतून कमीच झाली. एकंदरीत चौपटीहून अधिक उत्पादन वाढले तरी शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडून आले नाहीत. त्याची झोपडी, गळके घरं, ठिगळ लावलेले धोतर किंवा नऊवारी यात बदल झालेला नाही. याला जबाबदार कोण? यात शासनाची चूकीचे धोरणे, निसर्गाचा लहरीपणा, दलालीचा हव्यास यांसारख्या अनेक बाबींचा ...

राजकारण आणि युवक

Image
         राजकारण आणि युवक           भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला असल्याने राजकीय पक्ष अपरिहार्य आहेत. निवडणुका आणि राजकीय पक्ष यांना आपण वेगळे करू शकत नाही. निवडणूकीच्या माध्यमातून सत्ता मिळवून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. गाव/शहर पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते संसदे पर्यंत विविध लोकप्रतिनिधी हे निवडणुकीत राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपलं नशीब अजमावत असतात.राजकीय पक्षांना विरोध असण्याचे काहीच कारण नाही. मात्र राजकारणासाठी किती वाहून घ्यायचे हे युवकांनी ठरवले पाहिजे. घरदार, कामधंदा सोडून पुढा-याच्या नादी लागलोत तर खायचे वांदे होवू नयेत, यासाठीच हा लेख प्रपंच.           लोकशाही म्हटलं की दर पाच वर्षांनी निवडणुका आल्या. संसदेत विविध राजकीय पक्षांच्या मदतीने निवडून आलेले खासदार किंवा वरिष्ठ सभागृहाचे सदस्य देशासाठी विविध कायदे तयार करण्यात मोलाचे योगदान देतात. थोडक्यात कायदेमंडळ कायदे तयार करण्याचे महत्त्वपुर्ण कार्य करते. पंतप्रधान, मंत्रिमंडळ, राष्ट्रपती सह कार्यकारी...

बालपण हरवत चाललंय

बालपण हरवत चाललंय   बालपण म्हणजे निरागस, निर्विकारपणे व्यक्त होण्याची संधी. गतकाळात लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानाची गरज पडत नव्हती. सगळीकडे भलेमोठे मैदानच होते. आजूबाजूला फार मोठी बांधकामे झालेली नव्हती. वाटेल तेथे, वाटेल तो खेळ, वाटेल तेंव्हा खेळण्याची परवानगी होती. आजच्या काळातील फारशी बंधने नव्हती. पक्षी जसा स्वच्छंदी जीवन जगतो, अगदी तसेच जीवन या चिमुरड्यांच्या वाट्याला होते. मात्र बदलत्या काळानुसार बदलत्या अपेक्षेने मनमोकळे खेळण्यावर बंधनं आली. ख-याखु-या जीवनाला पारखे होत चाललेल्या चिमुकल्यांच्या हरवत चाललेल्या बालपणावर या लेखात ऊहापोह करू.             आपण आपल्या लहानपणात डोकावले तर अनेक गोष्टींचा धांडोळा समोर येईल. पाऊस भरपूर पडायचा, सर्वत्र चिखल असायचा. या चिखला पासूनच खेळण्यास सुरुवात व्हायची. अंगणात किंवा थोड्याच अंतरावर वर असलेला चिखल खेळायला उपयोगी पडे. त्यापासून जशी कल्पना सुचेल, ते बनवता येत होते. बैल, गाय, म्हैस, माणूस, रेडिओ, गणपती, मंदिर, किल्ला, टुमदार घर, सायकल अशा कितीतरी बाबींची वेडीवाकडी निर्मिती केली जायची. पाऊस भरपूर प...

जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?

Image
  जन्मदात्या आई-वडिलांचे ओझे का वाटावे?       मानवाने सर्वच क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली. जंगलात राहणारा आदिमानव ते एकविसाव्या शतकातील प्रगती पथावरील पांथस्थ असा प्रवास घडला. लाईट, टेलिफोन, वाफेचे इंजिन, विमान, जहाजे, संगणक, शेती, विज्ञान, तंत्रज्ञान असे नवनवीन शोध लावत सर्वच क्षेत्रात बदल घडवून आणले. पृथ्वी अपुरी पडू लागल्याने इतर ग्रहांचा आसरा शोधू लागलो. पुर्वी एक किलोमीटर जायला दहा ते पंधरा मिनिटे लागत होती, आज हजारों किलोमीटर चे अंतर काही तासांत पादाक्रांत करता येते. थोडक्यात विविध क्षेत्रातील अमुलाग्र बदलामुळे जीवनमान उंचावले. मात्र ही प्रगती करीत असताना काही पावले काळाच्या ओघात अधोगतीकडे कधी वळली, याचा विचार करायला उसंतच नाही. खेड्यात जोडणी (माळवद), आरसीसी च्या पक्क्या घरात राहणारे असो की शहरात आयटी क्षेत्र किंवा कोणत्याही परिस्थितीत कार्य करणारे चाकरमानी किंवा कामगार असोत. शहरी किंवा ग्रामीण भागातील आई-वडिलांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काही अपवाद वगळता इतरांना हे ओझे का वाटावे, काळजी घेणा-या महत्भागी मुलांचे स्वागच. मात्र या गंभीर प्रश्नाव...